कर्म हवे छान मराठी कविता
कर्म हवे छान मराठी कविता
नाही सर्वकाही । संपत्ती,वैभव ।
हृदयी साठव । प्रेमभाव ।।
शांत झोपेसाठी । कर्म हवे छान ।
कर श्रमदान । देशासाठी ।।
समाधान कुठे । विकत मिळेना ।
दुष्टांना पचेना । धनद्रव्य ।।
अन्नासाठी धाव । नाही पचावया ।
जना हसावया । जग जरा ।।
गरीब,श्रीमंत । मालक,नोकर ।
सगळे चाकर । निर्मिकांचे ।।
म्हणून जरासा । निट तरी वाग ।
आहे वेड्या राग । शत्रू तुझा ।।
धन निरर्थक । बिना उपयोगी ।
असतो निरोगी । कष्टणारा ।।
धनासाठी नको । नात्यामध्ये फूट ।
नको कधी कुट । कारस्थान ।।
अजू तुझ्यासाठी । वैभव सत्कर्म ।
करत अधर्म । जगू नको ।।
©️®️शब्दसखा – अजय रमेश चव्हाण
तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
Pingback: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता - मराठी 1