जागतिक चिमणी दिन मराठी कवीता
चिमणी
ये गं ये गं चिमणी बाई,
माझ्या ये गं ये गं तू दारी,
भिऊ नको, तुझेच घर,
खेळ कुठेही बिनघोर.१
समस्तांची तू बामणिन ताई,
पडता सावली,भूर्र उडून जाई,
शब्द देतो तुला गं राणीबाई,
सावली तुजवर पडणार नाही.२
हवं ते कर, मधे पडणार नाही,
ये गं ये गं गोड तू चिऊ ताई,
पर्यावरण रक्षणाची संधी देई,
आता नाही तर कधीच नाही.३
तुच नसशी तर ,आनंद कशाशी खाई?
हुसकाऊन देण्याचा ,करंटेपणा करणार नाही,
दुर्मिळ होत चाललीस ,कळत का मज नाही!
मातीच्या भांड्यात पाणी सदैव राही.४
दाणे ताटलीत पखरुन मी ठेवीत राही,
फिरुन जरी दाही दिशा ,दार उघडे राही,
पाठ फिरवू नकोस ,मी दुःखी होई,
कृत्रिम घरटं ,तुजसाठी विणून देई.५
राणी बनून बिंधास्त तेथे तू राही,
प्रतिज्ञा माझी दुःख देणार नाही,
एकदा केली चूक,होणेनाहीआनंद पर्वणी तू घेऊन येई.६
ये गं ये गं गोड माझी बाई,
साखर मनात माझ्या पेर ताई,
तुला कमी पडू देणार नाही ये गं,आरवं माझे ऐक ताई.७
चिमणी प्रेमी
मझिसु प्रा.मगन सुर्यवंशी

चिमणी
जागतिक चिमणी दिनानिमित्त कविता
२० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त
तू चिमणी
चिमणी
तू चिमणी
तुझी चिवचिवं
इवला इवलासा गं
आहे तुझा जीवं
आकाशी उडते
फांदीवर बसते
इकडून तिकडे
लपंडाव खेळते
इवले इवले पंख तुझे
इवली इवली चोच
निर्मळ मन तुझे
देह निर्मळ तोच
शेतातील कणसातून
दाणे रोज टिपते
एक एक दाणा तू
पिलांना भरवते
चार काड्या वेचते
खोपा घरटे बांधते
तू छोट्या पिल्लांचा
छान सांभाळ करते
भुर्रकन उडते
खाली वर करते
दाणा पाणी शोधण्या
नभी घिरट्या घालते
स्वच्छंदी विहार
पंखामधे जोर
सोबतीला चिमणा
नाही कसला घोर
तू चिमणी
तुझी चिवचिव
मंजूळ तुझी गं..
चिवं…चिवं… चिवं…चिवं….
कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर ,धुळे.
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

Pingback: मराठी कवीता (Marathi Kavita)चंचल नागिन - मराठी 1
Pingback: मराठी कविता कर्म हवे छान - मराठी 1
Pingback: होळीच्या हार्दिक शुभेच्छा - मराठी 1
Pingback: संत तुकाराम बीज - मराठी 1
Pingback: जागतिक रंगभूमी दिन मराठी कविता - मराठी 1