gudi padwa
gudi padwa गुढीपाडवा
नववर्ष आरंभानं
नववर्ष आरंभानं
जोति शिवबा बाबांच्या
जन्म उत्सवाची शान
करु स्वागत तयांचे
नववर्ष आरंभानं॥धृ॥
नको गुढ्या उभवा रे
मानवतेचे निशान
खरे स्वागत ह्यातच
खरोखरी हा सन्मान॥१॥
करु म्हणतो स्वागत
चैत्र नव्या चैतन्यानं
नव्या बहाराने केलं
सुरु चित्र चितारण॥२॥
करा संकल्प ही नवा
अंधश्रध्दा झुगारुन
चला स्विकारु विज्ञान
दूर अज्ञान सारुन॥३॥
महा मानवांचा असा
व्हावा मान नि सन्मान
नव्या मराठी वर्षाच्या
स्वागताच्या आरंभान॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक ९३७१९०२३०३
दिन माना सन्मानाचा
दिन माना सन्मानाचा
माझ्या मराठी वर्षाचा
मास पहिला मानाचा
नव पल्लवीचा आला
दिन नवा सन्मानाचा॥धृ॥
फाल्गुनाच्या पाठोपाठ
मास खास चैतन्याचा
झाली पानगळ अति
प्रिती बहार येण्याचा॥१॥
चित्र सृष्टीचे अवघे
अहा बदलविण्याचा
शालू वसुधेला देतो
चैत्र नवा नाविन्याचा॥२॥
नव्या सृष्टीस हरित
कांती नव्याने देण्याचा
पर्णहीन सृष्टीस ह्या
पुन्हा उभी करण्याचा॥३॥
गेली देऊन बहिणा
करा स्विकार ज्ञानाचा
नाही पाडवा रे दिन
नववर्ष नाविन्याचा॥४॥
गुढी झाली जुनी रुढी
सण जुना अज्ञानाचा
नववर्ष स्वागताचा
सण माना सन्मानाचा॥७॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
नवे हरिताचे लेणे
नवे हरिताचे लेणे
गूढ गुढीच्या रुढीचे
रुढ कर्ता तोच जाणे
आम्हा केवळ ठाऊक
नववर्ष गीत गाणे॥धृ॥
नव्या मराठी वर्षाच्या
आली स्वागता कारणे
आम्रतरुत कोकिळा
नवे छेडते तराणे॥१॥
आम्रतरुत जणु का
मधुरस पाझरणे
दाही दिशात ध्वनी तो
मधु स्वर झंकारणे॥२॥
मला भावते ऋतूत
अशा ऋततच जाणे
मागे वळून कशाला
मग उगीच पहाणे॥३॥
माझ्या वसुंधराईच्या
काय शृंगारास उणे
पाने फुले आणि फळे
नवे हरिताचे लेणे॥४॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
Pingback: gudi padwa festival शिवगुढी - मराठी 1
Pingback: gudi padwa 2024 marathi गुढीपाडवा - मराठी 1