दिल्ली सत्ता

दिल्ली सत्ता
दिल्ली सत्ता

दिल्ली सत्ता

स्वतःला सिध्द न करू शकणारी माणसं
सत्तेचा व्यापार करणाऱ्यांच्या मागे धावताय
त्यांच्या खोट्या अपेक्षेला बळी पडताय

अरे आईवडिलांनी दिवसभर
राब राब राबायचं
उन्हातान्हात घाम गाळून
स्वतःच्या मुलांसाठी
काम करत रहायचं
आणि या  रिकामटेकडे पोरांनी
घरदार सोडून नेत्यांच्या मागे फिरायचं

मुलगा घरी येत नाही म्हणून
आई दारात उभी राहून
मुलांची वाट बघत असते
बाप रात्रभर जागत असतो
फुकटच खाऊन पिऊन मुलगा
मध्यरात्री झिंगत झागंत येताना दिसतो

जेव्हा पोटाला भाकर मिळत नाही ना
तेव्हा जगणं थांबत असते
अशावेळी बापाच्या आधारे
रिकाम्या पोटात आईच
घास भरवत असते

अरै कार्यकर्ते असतात तेव्हांच तर
नेते ओळखले जातात
म्हणून तुम्ही फक्त यांच्या मागे
पळा पळ करायची
पण तुमच्या भुकेची कळ
या पुढाऱ्यांना कधी कळायची
हे पुढारी फक्त मतलबा पुरतेच
गोड गोड बोलत असतात
तुमच्या पायाचे फोड
हे कधीच  बघत नसतात

अरे भाऊ हे नेते पुढारी
फक्त खुर्चीचे पुजारी आहेत
यांना स्वत:च्या अस्तित्वाचा ठिकाणा
माहित नसतो
म्हणून स्वतःच घर सोडून
दुसऱ्यांच्या घरात गर्दी करत असतो

खोटे मुखवटे लाऊन फिरणारे
हे पांढरे बगळे
स्वतःच्या घरच्यांना ‌झाले नाही‌
तर तुम्हाला कस बरं होतील
काहीही झालं तरी हे तुम्हाला
सतरंज्याच उचलायला लावतील

अरे यांच्या मागे पळापळ करण्यापेक्षा
आपल आयुष्य खराब करू नका
यांचा राम राम पण घेऊ नका
स्वतःला सिध्द करुन
स्वतःचं अस्तित्व निर्माण करा
म्हणजे तुम्ही खऱ्याअर्थाने
माणूस म्हणून घ्यायला लायक असाल
नाही तर एक दिवस तुम्ही आयुष्यातूनचं वजा झालेले दिसाल.

खरचं आपलंच मत खाऊन
श्रीमंत होणाऱ्या नेत्यांच्या मागे
मत देऊन गरिबी होणारा कार्यकर्ता
पळतोय
काय आश्चर्य आहे नाही का?

दिल्ली सत्ता
संजय धनगव्हाळ
अर्थात कुसुमाई
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *