gudi padwa 2024 marathi गुढीपाडवा

gudi padwa 2024 marathi
gudi padwa 2024 marathi

गुढीपाडवा gudi padwa 2024 marathi

गुढीपाडवा

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1946! हिंदू नववर्षे दिवस! म्हणजे आजपासून ठीक 1946 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पहिला गुढी पाडावा सांजरा झाला ती परंपरा आजही उत्तम प्रकारे सुरु आहे. हर्ष आनंदात हां उत्सव आपण साजरा करतो.

भल्या पहाटे घरातील सर्वं मंडळी उठून कामाला लागतात. स्नान करून स्त्रिया सडा मार्जन करून स्वयंपाकालां सुरवात करतात. पुरुष मंडळी देव पूजा करून गुढी उभारतात.

बाबू हां अमर असतो अशी कल्पना हिंदू धर्मात आहे. म्हणूनं शंकराचार्य सुद्धा खांद्यावर हां वेळू दंड बाळगतात. देवाची देवकाठी सुद्धा बांबूचीचं असतें. यांच्या वरच्या टोकावर, एक नवे कोरे वस्त्र ठेवतात. त्याच्या सोबत आंब्याची पाने, निंबाची डहाळी, फुलांची माळ, हल्ला(साखर हार) बांधूना त्यावर तांब्याचा कळस उलटा करून ठेवतात. कळसाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. बांबूच्या टोकावर तो सरळ ठेवता येत नाही म्हणून उलटा ठेवतात. कडू निंब ही औषधी वनस्पती आहे, म्हणून त्याची पान घेतात. आंबा हां हिंदू धर्मात खूप पवित्र आहे. लग्ना पासून ते थेट प्रत्येक पूजा विधित आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. असा हा सजविलेला ध्वज दंड मग दारात उभा करून लावतात.

आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली

याला ब्रह्मध्वजही म्हणतात. आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आहे असं म्हणतात. हिंदू धर्मातील पवित्र साडेतीन मुहर्ता पैकी गुढी पाडावा हा एक मुहूर्त आहे.

सर्वं विधी, स्वयंपाक आटोपल्या वर सर्वं घरदार गुढीचीं पूजा करतात. तीला नैव्यद्य दाखवितात. आणि मग सर्व आनंदाने गोड धोड खातात. खांदेशात या सणाला खापरा वरच्या पुरण पोळ्या, खीर/आमरस, रशी भात, भजी, पापड, वडे, कुरडया अशी पंचपक्कवान करतात. तर महाराष्ट्रात काही ठिकाणी श्रीखंड पुरी, कुठे जिलेबी करतात. असा हां सण आहे.

खान्देशांत आजच्या दिवशी शेतकरी कुदळ घेऊन शेतावर जातात. शेतात जाऊन कुदळावर पाणी ओतून त्यावर हळद कुंकू वाहतात. आणि मग शेतात उगवलेली एकदोन झूडप खणतात. यातून शेतातील कामाचा नवं वर्षातील मुहूर्त साधतात.

खान्देशच्या दृष्टीनें गुढी पाडवा

या सणाचं खान्देशच्या दृष्टींनें अजून एक महत्व आहे. सुमारे दोन हजार वर्षां पूर्वी गोदावरीच्या खोऱ्यात एक अहिराणी भाषिक कुंभार  कुटुंब रहात होतं. त्यांना एक मुलगा होता. त्याचं नावं शालिवाहनं. त्या काळात महाराष्ट्र-खान्देश वर शकांचं राज्य होतं. हे शक परिकीय आक्रमक होते. ते मध्ये आशियातून भारतात येऊन सर्वं देश गुलामं करून ठेवला होता. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या शक सम्राटाचं नावं नहपान क्षहारात होतं.

तिकडे शालिवाहन लहान होता तेंव्हा त्या बाबत एक आख्याईका अशी आहे. त्याला खेळण्यासाठी त्या कुंभार आई बापाने मातीची खेळणी तयार करून दिली. त्यात हत्ती, घोडे, सैनिक, शिपाई, सरदार, रथ होते. त्यांच्या सोबत बाळ शालिवाहनं खेळत असे तर आई बाप कुंभार काम करत असत. एके दिवशी शालिवाहनंनें त्या खेळण्यावर पाणी शिंपडले आणि ती सर्वं खेळणी जिवंत झाली त्यांना घेऊन शालिवाहन याने युद्ध केली आणि तो सम्राट झाला.

ही दंत कथा आहे. याचा अर्थ मी असा लावतो कीं, परकीयांच्या सत्तेखाली जखडलेले आपलें लोक गुलाम होऊन मातीचीं बाहुली बनून जगत होती. त्यांच्यावर विचारांच पाणी शिंपडून शालिवाहन याने आपलें लोक जागृत केले. त्यातून क्रांतीकांरकांची फौज उभी केली.

हे सैन्य घेऊन तो शक सम्राट नहपान क्षहरांत याच्याशी लढला. साताऱ्या पासून नाशिक पर्यंत त्यांनी 20 युद्ध केली. शेवटचे युद्ध त्याच्यात नाशिक येथे झालं. हां खान्देश प्रदेश शालिवाहनंचा असल्यामुळे त्याला इथे मोठी कुमक मिळाली. त्याचा विजय झाला. तो हां गुडीपाडव्याचा दिवस आहे.

या विजया प्रित्यर्थ त्यांनी एक शिला लेख तयार केला. शालिवाहनं याची मातृभाषा आणि राजभाषा अहिराणी असल्यामुळे त्याचे सर्वं शिला लेख अहिराणी भाषेत आहेत. तो अहिराणी शिला लेख असा आहे, क्षहरांत वस निर्वस करस मराठीत त्याचा अर्थ असा होतो, क्षहारात वंश निर्ववंश करतो. हां लेख सध्या नाशिक येथील पांडव लेण्यात आहे.

या विजय दिनांची आठवण म्हणून शालिवाहनं राजाने नवी कालगनंणा सुरु केली शालिवाहन शके. गेली 1946 वर्षे आपण हां गुढी पाडवा सण साजरा करत आहोत. सुरवातीलां शालिवाहनं राजाची राजधानी नाशिक येथे होती. नंतर त्याने ती मराठवड्यात नेली. राजधानीचे नवे गाव वसंविले त्याचे नावं प्रतिष्ठान. याच प्रतिष्ठान नावाचा अपभ्रश पैठण आहे.


        असा हां पवित्र गुडीपाडवा तुम्हा सगळ्यांना आनंदाचा भरभराटीचा जावो.


बापू हटकर
 

gudi padwa 2024 marathi
gudi padwa 2024 marathi

1 Comment

  1. ASHOK S.WAGH

    अशा या बहुमोल ऐतिहासिक माहितीबद्दल बापू हटकर साहेबांना साष्टांग दंडवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *