मराठी कविता निर्यातबंदी
निर्यातबंदी
कधी अस्मानी मार
कधी सुल्तानी वार
जीणे बळीचे बेजार
सत्तेत बेअब्रू सरकार….
मनमानी बेकाबू व्यापारी
रोखीचा करती करार
परप्रांतीय रातोरात
माल घेऊन फरार….
लहरी झाला निसर्ग
नाही कसला आधार
संकटावर संकटे येती
पेरणी दुबार तीबार…..
आयुष्य डुबले कर्जात
उताऱ्यावर बॅंकेचा भार
घास उतरेना गळा
छळ करतो सावकार.. …
धीर खचला बळीचा
रातदिन अविचार करी
सहनशीलता जेव्हा संपते
देह लावी फासावरी.. ….
संसार वाऱ्यावर सोडून
पत्नीस दुख अपार
माय फोडी हंबरडा
नसे दुखा पारावार…..
लबाड विरोधी पक्षनेते
खोटी आश्वासने देती
खुर्चीवर बसता सत्तेची
शेतकऱ्याला मात्र विसरती……
निर्यात बंदीचे सरकार
बळीला नाही आधार
कंबरमोडुन नेले देशोधडीला
डोळा वाहे अश्रू धार…..
बळीराजा हो जागा
मतपेटीत घडव क्रांती
मुळासकट उखडून टाक
पोशिंद्या ला मिळेल शांती……
बळीराजा आता एक काम कर
बेभान राज्यकर्त्यांचा घाम धर
जे मेले शेतीत घाम गाळून
नको करू मतदान त्यांच्या स्मृती टाळून……
विवेक पाटील
मालेगाव (नाशिक)
९४०४२१२०३४
![मराठी कविता निर्यातबंदी](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/1d7adc134d904cc6584319554271d49b1021412267557810802.jpg)
![मराठी कविता संग्रह](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/pexels-surya-kant-5948519-1024x682.jpg)
![जागतिक कविता दिवस लेख विशेष](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/img-20240321-wa00116558974806320466802.jpg)
Pingback: मराठी गझल - मराठी 1