मराठी गझल

मराठी गझल
मराठी गझल

मराठी गझल

गझल माझी बोलते

लग्नाआधी प्रिये मला तू मधूर म्हटली
भार वाहिला नखऱ्यांचा तर मजूर म्हटली

पगार झाला अन् दिला तुझ्या हाती तेव्हा
लाडात मला करीत मुजरा हुजूर म्हटली

पैसे सरले महिनाअखेर आली मग तू
खिसा रिकामा दिसताच मला असूर म्हटली

माझ्या नशिबी कसे वेंधळे तुम्ही लाभले
फणकाऱ्याने हा नियतीचा कसूर म्हटली

कुशीत तारे सुंदर आले दोन आपल्या
संसाराची रात चांदणी टिपूर म्हटली

विनोदबुद्धी तुडुंब भरली तुझ्या मस्तकी
थट्टेत मला खिचडीमधला मसूर म्हटली

पक्षी उडले उरलो जेव्हा आपण दोघे
आयुष्याची गोड मला तू खजूर म्हटली



सुगंधानुज..
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

गझल माझी बोलते

गझल माझी बोलते

लग्नाआधी प्रिये मला तू मधूर म्हटली
भार वाहिला नखऱ्यांचा तर मजूर म्हटली

पगार झाला अन् दिला तुझ्या हाती तेव्हा
लाडात मला करीत मुजरा हुजूर म्हटली

पैसे सरले महिनाअखेर आली मग तू
खिसा रिकामा दिसताच मला असूर म्हटली

माझ्या नशिबी कसे वेंधळे तुम्ही लाभले
फणकाऱ्याने हा नियतीचा कसूर म्हटली

कुशीत तारे सुंदर आले दोन आपल्या
संसाराची रात चांदणी टिपूर म्हटली

विनोदबुद्धी तुडुंब भरली तुझ्या मस्तकी
थट्टेत मला खिचडीमधला मसूर म्हटली

पक्षी उडले उरलो जेव्हा आपण दोघे
आयुष्याची गोड मला तू खजूर म्हटली



सुगंधानुज..
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

1 Comment

Comments are closed