होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा,होळी शुभेच्छा,होळी शुभेच्छा फोटो

होळी गीत

होळीला आली पोरं नी
शिमगा धुळवड खेळून गेली !धृ!

होळीची धुळवड पोरांची गडबड
होळीचा शिमगा पोरांचा दंगा
पोरींचा इंगा घेतलाय पंगा
पंग्यात रंगानं न्हाऊन गेली  !१!

होळीला आली पोरं नी
शिमगा धुळवड खेळून गेली !धृ!

रंगायची इर्षा भांगेची नशा
अंगात मस्ती नी गावभर फिरती
रंग रंगात उधळू लागली !२!

होळीला आली पोरं नी
शिमगा धुळवड खेळून गेली !धृ!

डीजेच्या ठेक्यावर ढोलकीच्या तालावर
नाचतं डोलत वाजत गाजत
रंगोली खेळाया लागली !३!

होळीला आली पोरं नी
शिमगा धुळवड खेळून गेली !धृ!

कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
7588318543.
8208667477.

   रंग बावरी

    रंग बावरी
रंग उधळीत दिन
रंग पंचमीचा आला
भाव रंगी शब्द अन्
         चिंब कवितेचा न्हाला॥धृ॥
रंगी बेरंगी रंगल्या
शब्द फुलांच्या ह्या माला
शब्द फुलांच्या ह्या माळा
        अहा शब्दझुला झाला॥१॥
कवितेच्या ह्या झुल्यात
जीव जरा सुखावला
आता होता धरेवर
           झुला उंच झेपावला॥२॥
सर्वांआधी कवितेने
शुभ कामना चिंतल्या
मन भावना काव्यात
           आपसुकच गुंतल्या॥३॥
जन्म होळीत पोळला
जीव सारे विसरला
एक दिवस असा हा
          वयो वृध्दीचा तरला॥४॥
         निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
  शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.

      

  रंग बावरी

        रंग बावरी
रंग उधळीत दिन
रंग पंचमीचा आला
भाव रंगी शब्द अन्
         चिंब कवितेचा न्हाला॥धृ॥
रंगी बेरंगी रंगल्या
शब्द फुलांच्या ह्या माला
शब्द फुलांच्या ह्या माळा
        अहा शब्दझुला झाला॥१॥
कवितेच्या ह्या झुल्यात
जीव जरा सुखावला
आता होता धरेवर
           झुला उंच झेपावला॥२॥
सर्वांआधी कवितेने
शुभ कामना चिंतल्या
मन भावना काव्यात
           आपसुकच गुंतल्या॥३॥
जन्म होळीत पोळला
जीव सारे विसरला
एक दिवस असा हा
          वयो वृध्दीचा तरला॥४॥
         निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
  शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *