चित्रपटसृष्टीतील होळी गाण्यांची अविस्मरणीय उत्कटता

चित्रपटसृष्टीतील होळी गाण्यांची 
चित्रपटसृष्टीतील होळी गाण्यांची 

चित्रपटसृष्टीतील होळी गाण्यांची अविस्मरणीय उत्कटता

रंगपंचमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण. फाल्गुन  महिन्यात येणारा हा रंगाचा उत्सव होळी नंतर दुसऱ्या दिवशी साजरा होतो. विविध पंथ, जाती, धर्मातील लोकांना मनामनातील कटुता दूर करून सर्वांना एकत्र आणणारा रंगपंचमी हा ऐक्याचा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करतात .भारतात मुख्यत्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशात हा रंगपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात असतो.
          फक्त पारंपरिक रित्या होळी खेळणारे आपण सामान्य दर्शकांना फिल्मी होळी कशी असते  हे खरे तर आपल्याला एक पिढी पर्यंत माहित नव्हते.नंतर मात्र हिंदी चित्रपटातील होळी गाण्यांनी त्या पारंपरिक होळी खेळण्यात बदल आणले.आणि लोक तशी होळी खेळू लागले.

आपण नशीबदार आहोत की चित्रपट संगीतात आपल्याला एकसे एक शास्त्रीय संगीताने नटलेले तसेच मस्तीने भरलेली होळी गीते ऐकायला धमाल करायला, प्रियकरांना एक दुसर्‍याला छेडायला आणि मनसोक्त नाचायला मिळाली आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतही बदलत्या युगासोबत बदलत्या रुपात चित्रण केलेला होळीचा सण हाही त्याला अपवाद नाही असा हा सण आहे. झपाट्याने बदलणारे युग, तरुणाई, समाजाची विचारसरणी आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन हा सण मोडीत निघाला नाही, तर परंपरा कायम ठेवून आहे

चित्रपटसृष्टीतील होळी गाण्यांची अविस्मरणीय उत्कटता


    विविध रंगाची, गुलाल उधळण करीत त्या लांब पितळी पिचकाऱ्या आणि रंगाचे ढीग पायाने आणि हाताने कशी हवेत उधळावी हे आपण चित्रपटातील नायक नायिकांच्या
होळीच्या दृश्यातून शिकलो.
        सिनेसृष्टीतही राजकपूरची आर. के. स्टुडिओतील  होळी ऐतिहासिकच होती हे आपण दुरदर्शन, वृत्तपत्र,सीनेमासीकातील चित्रातून पाहीले.

चित्रपटसृष्टीतील होळी गाण्यांची 
चित्रपटसृष्टीतील होळी गाण्यांची 


  होळी गाणी रचना करण्यात गीतकार शकील बदायुनी आणि ती स्वरबद्ध करण्यात  संगीतकार नौशाद यांची  मास्टरी होती. त्यांची होळी गीते फारच गाजली व  आजतागायत ती होळी सणाला आपण ऐकतो पाहतो इतकी ती रसभरीत व कर्णमधुर आहेत.
दिलीपकुमार व मीना कुमारी चा ” कोहिनुर ” चित्रपटाचे नौशाद यांच्या धून वर रफी-लता यांचे अप्रतिम रसदार गाणे ‘तन रंग लो जी.. आज मन रंगलो.तन रंग लो.’ सोबतच “मदर इंडीया” तील ‘ होली आयी रे कान्हाई होली आयी रे..रंग छलके, सुनादे जरा बासूरीss..’ तेवढेच मधुर आणि संगीतमय आहे.

चित्रपटसृष्टीतील होळी गाणी

राजेशचे खन्नाचे ‘कटी  पतंग’चे एक गाणे होळीचे होते ‘आज न छोडेंगे हमजोली..’पण  या गाण्याचे सादरीकरण आणि माहोल  अति गंभीर प्रकारचा होता.ते गाणे विस्मृतीत गेले.  अमिताभ ही स्वतःला या होळीच्या रंगापासून वाचवू शकले नाही “रंग बरसे..भिगे चूनर वाली..रंग बरसे. व  १९७५ चे ‘ शोले ‘ चित्रपटातील धर्मेंद्र हेमा मालीनीवर चित्रीत
“होली के दिन दिल खिल जाते हैं” हे गाणे त्या प्रसिद्ध होळीच्या गाण्यांपैकी एक आहे जे होळीच्या दिवशी रस्त्यांवर, मोहल्ल्यात सुमारे पंचेचाळीस वर्षांपासून सतत वाजवले जाते.

    हिंदी चित्रपटाचे इतिहासात सर्वात वरचढ आणि प्रचंड धमाल होळी गीत म्हणून चित्रपती  व्ही. शांताराम निर्मित “नवरंग ” या गाजलेल्या संगीत प्रधान चित्रपटातील ‘जा रे हट नटखट..छू ना मेरा घुंघट.. के पलटके दूंगी आज गाली रेsss… मोहें समझो ना तुम भोली भाली रे..’ या गाण्याची नोंद करावीच लागेल. इतके ते रसभरीत आणि कोणालाही आपसूक ठेका धरायला लावणारे दृश्य-वाक गाणे आज पर्यंत पडद्यावर चित्रांकित झालेले आठवत नाही.

भरत व्यास यांनी लिहिलेले, महेंद्र कपूर व आशा भोसले यांच्या आवाजातील महिपाल  व  संध्या वर चित्रीत दृश्यांतून  संगीतकार सी. रामचंद्र यांनी गाण्याच्या अंती नृत्य करीत असलेला हत्ती आणि अभिनेत्री संध्या यांच्या पुरुष-स्त्री डबल पात्री नृत्य तालावर सुमधुर धडाकेबाज संगीत देण्यात तर कमालच केली आहे. दर प्रत्येक पांच सेकंदा नंतर यात संगीताचा पॅटर्न बदलत असतो आणि असे मोजून सात वेगवेगळे संगीत पॅटर्न संगीतकार सी.रामचंद्र यांनी  कलात्मक  कौशल्याने अप्रतिमरित्या  सादर केलेली आहेत.


हिंदी चित्रपटाचे इतिहासात आज पर्यंतचे सर्वात लांब ८ मीनीटाचे लांबलचक गाणे असूनही डोळ्याची पापणी न लवता मनाचा ठाव घेणारे  सर्वोत्तम लोकप्रिय होळी गीत “नवरंग” चे हे गाणे निर्माते दिग्दर्शक व्ही.शांताराम यांची अदभूत कलाकृती होती हे निर्वीवाद पणे कबूल करावेच लागेल!

     – वा.पां.जाधव
     सिने अभ्यासक
            अमरावती
   (९४२२८५६५७२)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *