सोपे उखाणे
स्त्रियांसाठी सोपे उखाणे
सोपे उखाणे
१. लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती, – सारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती?
२. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, – नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
३. कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, केला मला सौभाग्याचा आहेर.
४. कलमी आंब्याला झारीने करते शिंपण, चे नाव घेऊन सोडते कंकण.
५. सागराला शोभते निळाईचे झाकण, चे नाव घेऊन सोडते कंकण.
६. जाईजुईच्या फुलांचा मधुर सुटतो सुवास, चे नाव घेऊन देते घास.
७. भक्तासाठी वेडा झाला नंदन, नाव घेते सर्वांना करून वंदन
८. इंद्राच्या नंदनवनात अप्सरा गातात गोड, भाग्याने लाभली जोड.
९. शंकराची पूजा पार्वती करते वाकून, • नाव घेते सर्वांचा मान राखूनः
१०. सूर्यबिंब शोभते संध्येच्या भाळी, नाव घेते संध्याकाळच्या वेळी.
११. घास घेण्यासाठी हातात घेतले पुरी श्रीखंड, ना लाभो आयुष्य उदंड.
१२. आईवडिलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी, माहेर सोडलं रावांच्या सौख्यासाठी.
१३. गुलाबपाकळीपेक्षा नाजूक दिसते शेवंती, • राव सुखी राहोत हीच माझी विनंती.
१४. ज्योतीने ज्योत पेटते, प्रीतीने प्रीती वाढते, – चे नाव तुमच्यासाठी घेते.
१५. आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे, —- हेच माझे अलंकार खरे.
१६. राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, •चं नाव घेते आनंद माझ्या मनाला.
१७. कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन, च्या जिवावर आदर्श संसार करीन.
१८. आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण, चे नाव घेऊन बांधते कंकण.
१९. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, नाव घेते पत्नी या नात्याने.
२०. राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात्, नाव घेते नीट ठेवा लक्षात.
२१. महादेवाच्या पिंडीला वेल वाहते ताजा, नाव घेते पहिला नंबर माझा.
२२. कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास, ना घालते लाडूचा घास.
२३. राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात,
—-चे नाव घेतेच्या घरात.
२४. सासरचे निरंजन माहेरची फुलवात, – चे नाव घेण्यास करते सुरुवात.
२५. सागराला आली भरती, नदीला आला पूर, • च्या सौख्याकरता आईबाप केले दूर.
मराठी विवाहसोळा उखाणे मराठी उखाणे
२६. लवंग, जायपत्री पानाचा विडा,
रावांच्या नावाने भरते लग्नाचा चुडा
२७. महादेवाला वाहते बेल, विष्णूला वाहते तुळस, रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.
२८. भिलवडीचा आहे प्रेक्षणीय घाट, रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळीची गाठ.
२९. मला नाही काही येत मी आहे साधी, रावांचं नाव घेते सर्वांच्या आधी.
३०. सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला, रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा मला.
३१. काश्मीरच्या नंदनवनात फुलला निशिगंध, रावांच्या जीवनात मला आहे आनंद.
३२. इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास, रावांच्या संसारात मला नाही त्रास.
३३. काचेच्या तांब्यात सरबत आहे गार, रावांचं नाव घ्यायला उशीर झाला फार.
३४. हिरवा शालू नेसून आले, रावाच्या जीवनात समरस झाले.
३५. गोपाळ कृष्णाला बासरीचा आहे छंद, रावांचे जीवनात मला आहे आनंद.
३६. ईश्वराविषयी मनी श्रद्धा, निष्ठा असावी ज्वलंत, • ची पत्नी म्हणून मी ठरले भाग्यवंत.
३७. पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा, रावांच्या जिवावर भरला हातभर चुडा.
३८. चंद्राभोवती तारकांनी धरलं गोल रिंगण, रावांच्या नावाने बांधलं मी कंकण.
३९. वर्षाऋतूमध्ये वरुणराजाने केली बरसात, नाव घेण्याला केली मी सुरुवात.
४०. घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस, च्या जीवनात चढवीन मी आनंदाचा कळस.
४१. गौरीपुढे हळदीकुंकवाच्या राशी, रावांचे नाव घेते चैत्रमासी.
४२. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
४३. भाद्रपद महिन्यात गणपती बसवतात शाडूचा घास देते लाडूचा.
४४. चांदीच्या ताटात रुपये तीनशेसाठ – नाव घेऊन बांधते मुंडावळीची गाठ.
४५. पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा, – च्या नावावर भरला सौभाग्याचा चुडा
४६. विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी, – चे नाव घेत तुमच्यासाठी.
४७. सौभाग्याचे लेणे काळी पोत, च्या जीवनात उजळीन जीवनज्योत.
४८. चंद्रामुळे रंगला रोहिणीचा साज, नाव घेत गोड दिवस आज.
४९. गौतमांच्या शापाने अहिल्या झाली शिळा, च्या नावाने लावते टिळा.
५०. राम गेले वनास, राज्य दिले भरता, चे नाव घेते सर्वांच्या करिता.
Pingback: marathi ukhane - मराठी 1
Pingback: ukhane in marathi - मराठी 1