ukhane in marathi

ukhane
ukhane

ukhane in marathi

marathi ukhane

स्त्रियांसाठी सोपे उखाणे १ ते ५०

marathi ukhane ५१ ते १००

मराठी विवाहसोळा उखाणे मराठी उखाणे

ukhane in marathi
ukhane in marathi

बायकांचे उखाणे

marathi ukhane for female

१०१. नदी आहे पर्वतदुहिता, चे नाव घेते आपणाकरिता.

१०२. संस्कृतमध्ये नदीला म्हणतात सरिता, चे नाव घेते आपल्या आग्रहाकरिता.

१०३. श्रीकृष्णाची झाली तुला रुक्मिणीच्या तुलसीपत्राने, •चे नाव घेते मोठ्या आनंदाने.

१०४. लग्नमंडपी निनादतात सनईचे सूर, – च्या साठी आईवडिलांचे घर केले दूर.

१०५. धनाचे दैवत लक्ष्मी, तर विद्येचे सरस्वती, ची आहे माझ्यावर प्रीती.

१०६. हृदयाची श्रीमंती स्वभावात आणते दानशूरता, —- ची मी आहे कांता.

१०७. भोळ्या शंकराला बिल्वपत्रांची आवड, ची पती म्हणून केली मी निवड.

१०८. यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, चे नाव घेण्यास करत नाही विलंब.

१०९. काव्यप्रकारात मोरोपंतांची प्रसिद्ध आर्या, नाव घेत ची भार्या.

११०. संगीताला लागते तबलापेटीची साथ, आहेत माझे प्राणनाथ.

१११. वसंताच्या आगमनाने सृष्टी होते पुलकित, चे नाव घेताना मन होते आनंदित.

११२. चंद्राला रोहिणी भेटे आकाशी, चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

११३. मानससरोवरात विहार करते राजहंसाची जोडी, च्या नावात आहे शर्करेची गोडी.

११४. पौर्णिमेच्या रात्री आकाशात प्रकाशते पूर्ण चंद्रबिंब, चे नाव घेण्यास लावत नाही विलंब.

११५. उखाणा घे उखाणा घे करू नका गलबला, पूर्वपुण्याईने सारखे पती लाभले मला.

११६. खवळला समुद्र लाटा काठोकाठ, रावांचे नाव घेते

च्या पाठोपाठ.

marathi ukhane
marathi ukhane



११७. शिवाजीसारखा पुत्र, जिजाईसारखी माता, चे नाव घेते कांता.

११८. शामकृष्ण कन्हैयाला राधेचा ध्यास, देते जिलबीचा घास.

११९. भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची, घास देते पंगत बसली मित्रांची.

१२०. कमलदलांमध्ये उभी लक्ष्मीमाता, – चे नाव घेते कांता.

१२१. सासुरवाशीण मुलीने राखावा थोरामोठ्यांचा मान, रावांना कन्या केली दान.

१२२. राम सीता लक्ष्मण चालले वनात, रावांच्या मी आहे सहभागी जीवनात.

१२३. हरिश्चंद्र राजा, रोहिदास पुत्र, – च्या नावाने घातले मंगळसूत्र.

१२४. इमारत बांधायला मजूर लागतात कुशल, —- नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.

१२५. सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान,

ची राणी झाले मी आहे भाग्यवान.

marathi ukhane
marathi ukhane



१२६. अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा, रावांच्या नावाने भरते लग्नचुडा.

१२७. गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,

रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी.

१२८. सोन्याचं मंगळसूत्र सोनारांनी घडवलं, रावांचं नाव घेते मैत्रिणींनी अडवलं.

१२९. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, – रावांच्या नावाने घालते सौभाग्याचा चुडा.

१३०. दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी, रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी.

१३१. शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा, – रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा.

१३२. जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, – च्या सह संसार करीन सुखाचा.

१३३. जीवनाच्या प्रांगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी, चा उत्कर्ष होत राहो हेच मागणे देवापाशी.

१३४. शंकरासारखा पिता अन् गिरिजेसारखी माता, – रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता.

१३५. वर्षाऋतूत दिसते इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान, चे नाव घेऊन राखते सर्वांना मान.

१३६. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, चे नाव घेते पत्नी या नात्याने.

१३७. कमळ आहे आपले राष्ट्रीय फूल, रावांनी घातली मला भूल.

१३८. लग्नासारख्या मंगल दिनी नका कोणी रुसू, ना घास देताना मला येते गोड हसू.

१३९. रुप्याची झारी, सोन्याचा तिला गिलावा, • सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा.

१४०. नीलवर्ण आकाशात प्रकाशमान शशी, —- चे नाव घेते—- च्या दिवशी.

१४१. चंद्रांच्या आकर्षणाने समुद्राला येते भरती, —- च्या हृदयी आहे माझ्यासाठी प्रीती.

१४२. विवाहाला अग्निनारायणाची असते साक्ष, च्या संसारात मी सदैव दक्ष.

marathi ukhane
marathi ukhane




१४३. ‘ॐ नमोजी आद्या’ ने ज्ञानेश्वरीची सुरुवात, – नि माझी जोडी ठेव सुखात.

१४४. नित्य नवीन शोधांनी गुंग होते मती, ध्यानी मनी नसताना • मिळाले पती.

१४५. शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल जाहले, मी छाया होऊन सप्तपदी चालले.

१४६. वाऱ्यासंगे ताऱ्यांसंगे छेडीत जातो छंद मनाचा, — सवे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा.

१४७. श्रावणाच्या शिडकाव्यांनी आनंदली धरणी, चे नाव घेता सुखावले मी माझ्या मनी.

१४८. पृथ्वी मोलाचं लाभलं सौभाग्याचं लेणं, ची साथ असता मला काय उणं ?

१४९. सप्तपदीची सात पावले सात जन्माची ठरावी, रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी.

१५०. लता डोले, कुंज डोले, डोले वनश्री, च्या जीवनात उजळो भाग्यश्री.

सोपे उखाणे
सोपे उखाणे

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *