marathi ukhane for female

marathi ukhane for female
marathi ukhane for female

मराठी उखाणे

marathi ukhane for female

ukhane in marathi

marathi ukhane

स्त्रियांसाठी सोपे उखाणे

१५१. मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम, —- च्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम.

१५२. गोऱ्या हातावर खुलतो मेंदीचा रंग, चे नाव ऐकण्यात माझ्या सख्या झाल्या दंग.

१५३. पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, – चे नाव घेते तुम्हा सर्वांकरिता.

१५४. शंकराला वाहतात त्रिदळी पान, •

चे नाव घेऊन राखते तुमचा मान.

१५५. अष्टकोनी टेबलावर रुमाल टाकते विणून चे नाव घेते आग्रह केला म्हणून.

१५६. ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, चे नाव घेते — दिवशी.

१५७. रासक्रीडेमध्ये कृष्ण उडवितो रंग दाट, • रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.

१५८. भाद्रपद महिन्यात गणपती करतात शाडूचा, – ना घास देते लाडूचा.

१५९. पानोपानी शकुनाच्या कोमल हिरव्या रेषा, —- च्या जीवनाच्या पुरवीन साऱ्या आशा.

१६०. सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान, – रावांचे नाव सांगून राखते आपला मान.

१६१. श्रावण महिन्यात दरवळतो पारिजातकाचा सुवास,

चे नाव घेऊन देते घास.

marathi ukhane for female
modern marathi ukhane for female



१६२. स्वप्नासाठी हरिश्चंद्राने केले सर्वस्वाचे दान, •चे नाव घेऊन राखते तुमचा मान.

१६३. संस्कृतमध्ये नदीला म्हणतात सरिता, नाव घेते सर्वांकरिता.

१६४. आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून, – रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.

१६५. मान्सूनचे आगमन पर्जन्याची चाहूल, नाव घेऊन टाकते मी पाऊल.

१६६. क्रियापदाविना वाक्याची नाही पूर्ती, • नाव घेते हीच माझी स्फूर्ती.

१६७. इंद्रधनुष्यात असतात सात मोहक रंग, रावांचे नाव घेते संसारात झाले दंग.

१६८. यमुनेच्या डोहात, कृष्णाने केला खेळ, • रावांचे नाव घेते झाली संध्याकाळची वेळ.

१६९. रात्रीनंतर दिवस येतो, दिवसानंतर रात्र येते, नाव घ्यायला कारण शोधत होते.

१७०. घराला असावे अंगण, अंगणात शोभावी तुळस, च्या जीवनावर चढवीन आनंदाचा कळस,

१७१. रुसलेल्या धरेला श्रावण म्हणतो हास, – रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

१७२. वैशाखात येतो अक्षयतृतीयेचा सण, चे नाव घ्यायला लागत नाही कारण.

१७३. ज्येष्ठात करावी वटसावित्रीची कथा, च्या जीवनात कसलीच नाही व्यथा.

१७४. श्रावणात चालतो ऊन-पावसाचा खेळ, चे नाव घ्यायला लावत नाही वेळ.

१७५. कार्तिकात येतो दीपावलीचा सण, चे नाव घ्यायला आग्रहाचे कारण.

१७६. फेब्रुवारीत गार पाण्यासाठी ठेवावा लागतो माठ, चालतात नेहमी भराभर आणि ताठ.

१७७. पारिजातकाचे फूल म्हणजे सात्त्विक सौंदर्याचे प्रतीक, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले – सारखे पती.

marathi ukhane for female
marathi ukhane for female

मराठी विवाहसोळा उखाणे मराठी उखाणे

ukhane
ukhane

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *