मराठी कविता संग्रह (Marathi Kavita)

मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह

सण करा नाविन्याचा

आम्हा महिलांचा आला
दिन मान सन्मानाचा
नित्य हवा आम्हा दिन
असा मान सन्मानाचा॥धृ॥
हक्क दिधला आम्हास
जोति-साऊंनी ज्ञानाचा
एक मानव म्हणूनी
   तसा मिळावा मानाचा॥१॥
आधी आला होलिकेचा
स्वाहा होळीत होण्याचा
सत्य असो की रचित
होलिकेत जळण्याचा॥२॥
गेले जोतिबा देऊन
वसा सत्य शोधण्याचा
पर्यावरण रक्षण
दिन आले करण्याचा॥३॥
जाती-भेद अभेद ही
आधी हिला जाळण्याचा
अंधश्रद्धा अंधःकार
सण करा जाळण्याचा॥४॥
असा करा बांधवांनो
सण नवा नविन्याचा
तुम्हापरी आम्हासही
मानवच मानण्याचा॥५॥
     निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

आम्ही सावित्रीच्या लेकी

माय सावित्रीने दिली
आम्हा शिक्षणाची प्रिती
दिली अक्षर ओळख
          जगण्याची अन् रिती॥धृ॥
झाली त्यातून आमुची
आज ओळख निर्मिती
जीवनात ज्ञात झाली
         खरी शिक्षणाची गती॥१॥
एक झालो आम्ही सार्या
आज सावित्रीच्या लेकी
अंधश्रद्धा अज्ञानाला
        आता आम्ही अनोळखी॥२॥
मुर्ती स्थापिली हृदयी
एक आम्ही सावित्रीची
हिच ओळख आमुची
           मुर्तीमंत सावित्रीची ॥३॥
एक एक आम्ही सार्या
आज सावित्रीच्या लेकी
एक एक सावित्रीच
      जग आम्हास ओळखी॥४॥
ठेऊ ओळख सर्वदा
अबाधित ही आमुची
ठेऊ स्मृती ही जागृत
      ज्ञानज्योती सावित्रीची॥५॥
         निसर्ग सखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

      वारसा

आम्हा साठी सुरु केली
माय सावित्रीने शाळा
क ख ग घ  च छ ज झ
              असा लाविलाही लळा॥धृ॥
हिच्या विना कोणतेही
  गाणे रुचेनाच गळा
  हिने शिकविली कशी
               खुलवावी शब्दकळा॥१॥
ज्ञान सागरातून हा
उमळला शब्दमळा
शब्दमळा भावमळा
               मला भावला आगळा॥२॥
सत्यधर्म जोतिबाचा
माऊलीने फुलविला
आसमंत ज्योतीने त्या
                   अवघाच दिपविला॥३॥
कन्या जोति- सावित्रीची
मीही मिरविते मला
जीव असे तो जीवात
               वारसा मी चालविला॥४॥
        निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
  दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३

  जावे काट्यांच्याही वाटे

फुल काट्यात फुलते
म्हणे फुल गुलाबाचे
त्याचे करिते रक्षण
          परी कुंपण काट्याचे॥धृ॥
नाही जीवन सांगते
त्यास जणु एकट्याचे
काटे साहणे लक्षण
              खरे जीवन पटाचे॥१॥
पट अधुरा सोडणे
नाही नशिब कुणाचे
पार करावे तरावे
             बाळ तेच हो गुणाचे॥२॥
ऋतू तिन जीवनाचे
ऊन वारा पावसाचे
सारे काही सोसायाचे
              नाव जीवन तयाचे॥३॥
मार्ग जीवनाचे सोपे
नाही सांगणे काट्याचे
ठायी ठायी भासतील
          जसे खरेच खोट्याचे॥४॥
काट्या-कुट्यातून काढा
वाट सांगणे काट्याचे
काट्यातूनही सुगंध
            असतात वाटायाचे॥५॥
     निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव. खान्देश, महाराष्ट्र, भारत.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.

  चुंबळ

जडभारी ओझ्याहून
सांग कशी तू प्रबळ
ओझं पेलण्यास बळ
          मला देतेस चुंबळ॥धृ॥
वस्त्र आम्ही बनविले
तन तुझे ते चुंबळ
डोक्यासवे मान माझी
           रक्षितेस तू चुंबळ॥१॥
आम्ही माता पिता तुझे
जरी आमुची तू बाळ
लेक माझी करितेस
माझ्या डोक्याचा सांभाळ॥२॥
जीव तुझा चिमुकला
येते कोठून ग बळ
सांग कशी बाई झाली
         माझ्याहून तू सबळ॥३॥
ओझं असो किती भारी
नाही तुझी चुळबूळ
नाव तुझे म्हणून का
       झाले जाहिर  चुंबळ॥४॥
कसं कुठून ग येतं
तुला आभाळाचं बळं
कसं पेलणार ओझं
       तुझ्याविना तारांबळ॥५॥
   निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.

याद करा अन्नदाता

अन्न पूर्णब्रम्ह म्हणे
पहा माझी साऊमाता
पूर्ण ब्रम्हाचा निर्माता
        कष्टकरी अन्नदाता॥धृ॥
हाच ब्रम्ह हाच पिता
तरी हात याचा रिता
बळी राजा एकमेव
     खरा विश्वाचा तारिता॥१॥
येता पितरांचा पक्ष
पितरांना बोलाविता
घास एकेक अन्नाचा
        स्वाहा अग्नीत करिता॥२॥
कधी अग्नीस अर्पिता
तृप्त कावळा करिता
मृत व्यक्तिच्या आत्म्यास
     कावळ्याला संबोधिता॥३॥
येता अक्षय तृतिया
होळी संक्रांत ही येता
कोण पहाते अदृश्य
          कसे पितरे जेवता ॥४॥
घास एकेक अन्नाचा
आगारीत स्वाहा होतां
याद एकवेळ करा
         कष्टकरी च्या कष्टाचा।५॥
घेता वदनी कवल
याद करा अन्नदाता
बळी वाचूनिया दुजा
         नसे कुणी अन्नदाता ॥६॥
    निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
  दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

मराठी कविता

पाणीपुरीची मौज (Marathi Kavita)

स्त्री(Women)गणित आयुष्याचे

अशीच असतें आई (Aai)

मराठी कविता (Marathi Kavita) वहिवाट

उत्सुकली वसुंधरा

    उत्सुकली वसुंधरा
शालू हिरवा नेसली
अहा! माझी वसुंधरा
फुला पानांचे छापिल
          वस्त्र ल्यायली सुंदरा॥धृ॥
वासंतिक प्रभावाने
माझी शृंगारली धरा
नेत्र भरुन साठवा
           ठेवा निसर्गाचा खरा॥१॥
ऐका पक्षांचे गायन
कानी मधु- स्वर भरा
सारा देहात साठवा
         माझ्या धरेचा नखरा॥२॥
खरा हाच हो आनंद
दुजा कोणता न खरा
करा होळी पण जाळा
      पाला- पाचोळा कचरा॥३॥
नका करु ओकी-बोकी
माझी वसुधा सुंदरा
वसंताच्या स्वागतास
            उत्सुकली वसुंधरा॥४॥
       निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी*, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :-९३७१९०२३०३.


   


      


9 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *