वासोटा किल्ला

वासोटा किल्ला
वासोटा किल्ला

वासोटा किल्ला

वासोटा किल्ला.. जि.सातारा
(भाग-०१)

नानाभाऊ माळी

थरार!थरारकता!नजरेला दिसणारे थरकाप उडवणारे उभट कडे!खोल खोल दरी!अतिशय उंच शिखर!छातीला धस्स होईल,नजरेला गरगरायला होईल असं श्वास श्वास रोखून एकचित्त पाहता येणार आव्हानत्मक ठिकाण म्हणजे वासोटा किल्ला होय!पुण्यापासून साधारण १८० किलोमीटर लांब असणारा वासोटा किल्ला आहे!साताऱ्यापासून कास पठारमार्गाने बामणोली गावापासून कोयना डॅमच्या बॅक वॉटर मधून मोटर बोटीनें दिड तास अंतर पार केल्यावर वासोटा किल्ला आहे!ग

बोटीतून खाली उतरल्यावर पुढे बामणोली व्याघ्र राखीव जंगलातून पायवाटेने पुढे जात राहायचं!घनदाट जंगलातून दोन तास पायपीट करीत!अंगावर येणारा अवघड रस्ता पार करून वासोटा किल्ल्यावर जाता येतं!किल्ल्याच्या तटबंधीतून प्रवेश करीत वरती उंच शिखरावरपठार आहे!किल्ल्यावरही घनदाट जंगलं पायी चालत अचानक पठाराच्या टोकावर येऊन पोहचावं!ध्यानीमनी नसतांना अचानक खोल खोल काही किलोमीटर खोल दरी नजरेस पडावी!खाली खोलवर नजर जावी अन गरगरायला व्हावं!गप्पकण जागेवरचं भीतीने बसावं असं दृष्टी फिरवणारं दृश्य नजरेस दिसावं!श्वास रोखत, हिम्मत वाढवीत एक एक पावलं जपून पुढे टाकावी!अन किल्ल्याच्या अरुंद पठारावरून इको पॉईंट, टकमक टोक!प्राचीन महादेव मंदिर पाहात बसाव!धडकी भरविणारे उभट कडे पाहात एक एक पावलं जपून पुढे सरकत राहावं!श्वास रोखून निसर्गाचं अविस्मरणीय रूप पाहात राहावं!

सह्याद्रीचं अफाट, विशाल रूप पाहात राहावं असं ठिकाण म्हणजे ‘वासोटा किल्ला!’ होय!आम्ही शनिवार दिनांक ०७ डिसेंबर २०२४ रोजी पुण्याहून वासोटा किल्ला चढाईला गेलो होतो!कानिफनाथ ट्रेकिंग अँड हेल्थ क्लबचे अध्यक्ष श्री शाम कुंभार सरांच्या नेतृत्वाखाली आमचा जवळपास २५० जणांचा ग्रुप होता!सर्वजन आपापल्या वाहनाने साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ल्याला वंदन करून कास पठाराच्या दिशेने निघालो होतो! कास पठारावर लांबवर सुकलेलं सुष्क गवत दिसतं होतं!पावसाळ्यातील ऑगस्ट-सप्टेंबर महिना म्हणजे कास पाठरावरील नयन मनोहरी स्वर्ग अवतरलेला असतो!तेथील दृश्य डोळ्यात भरून मनसोक्त निसर्गात उधळून घ्यावसं वाटत असतं!उमललेली विविध रंगी, विविध प्रजातीची फुलं नजरेच्या दुर्बीनीने टिपून घ्यावीशी वाटतात!पावसाची रिपरिप सुरू असतें!त्यात हिरवाईचा सुंदर गालिचा न्याहाळत एकाहून एक सुंदर फुलांच्या कास पठारावर स्वतःस समर्पित करून टाकावंसं वाटतं!पण आता डिसेंबरमध्ये सुऊ आहे!कोरड्या, सुष्क गवताला न्याहाळत आमचा प्रवास पूढील डेस्टिनेशनसाठी सुरू होता! कास पठारावरून घनदाट जंगलांची वेडीवाकडी वळणे पार करीत आमची गाडी पुढे पळत होती!आमचे मित्र श्री. उदयभान पाटील गाडीचे सारथ्य करीत होते!सोबत दुसरे मित्र श्री नंदकुमार गुरव सर होते!छोटे मोठे घाट,चढ-उतार पार करीत काळ्याशार डांबरी रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू होता!सूर्यदेव मावळतीला निघाला होता!संधीप्रकाशाने आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती!काही वेळाने पश्चिमेंकडील संधीप्रकाश देखील आम्हास सोडून जात होता!संधी साधून अंधार पसरू लागला होता!दिशाभूल होऊ नये म्हणून आम्ही त्या घनदाट जंगलातून गूगल मॅप लावला होता!गुगल मॅपलाही न जुमानणारा, गुंगारा देणारा तेथील भाग एकांती वाटत होता!उंच डोंगर,खोल दरीमुळे नेटवर्क जात येत असावं!बरोबर संध्याकाळी सहा वाजता कास पठारापासून ३०-३५ किलोमीटर अंतरावर आम्ही 'बामणोली' या लहानशा खेडेगावात जाऊन पोहचलो!रात्री हॉटेल भैरवनाथमध्ये जेवल्यावर थोडं फिरायला बाहेर पडलो होतो!बामणोली गाव समुद्र किनारी असावं असं वाटून गेलं!दूरवर चौफेर पाणी पसरलेलं दिसतं होतं!गाव देखील डोंगर पायथ्याशी होतं!चौकशी केली असता कळलं किं,कोयना नदीवर बांधलेल्या कोयना धरणाचं बॅकवॉटर समुद्रा सारखंअफाट विशाल दिसतं होतं!रात्रीच्या ट्यूबलाईट उजेडात धरणाचं अथांग रूप डोळ्यात भरत होतं!

काही वेळ फेरफटका मारला!अन धरणाच्या त्या बॅक वॉटर शेजारीचं जमिनीवर अनेक कापडी-प्लास्टिक ‘टेंट’ बांधले होते!प्रत्येक टेन्टमध्ये दोन दोन व्यक्ती झोपतील अशी व्यवस्था केली होती!पांघरायला ब्लॅंकेट दिलेली होतीचं!कोयना डॅम बॅक वॉटरचा थंडगार गारवा अंगावर घेत टेंटमध्ये झोपी गेलो!सकाळी वासोटा केल्यावर जाण्यासाठी बोटीवरून प्रवास सुरू होणार होता!

(साहसी अविस्मरणीय प्रवासाचं क्रमश: वर्णन भाग-०२ मध्ये पाहू!)

नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-११ डिसेंबर २०२४