इर्जुक कथासंग्रहाचे प्रकाशन काड्याची वाडी हर्शुल येथे संपन्न
आदिवासी साहित्यिक देवचंद महाले लिखित कथासंग्रहाचे प्रकाशन प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते
काड्याची वाडी (हर्शुल) येथील ‘तारपा धून’ सभागृहात आदिवासी साहित्यिक तसेच दैनिक लोकसत्ता चे पत्रकार देवचंद महाले लिखित “इर्जुक” कथासंग्रहाचे प्रकाशन माजी स्वातंत्र सैनिक आणि पर्यावरण मित्र लक्ष्मण महाले, राकेश वानखडे, संजय दोबाडे, रवी बुधर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे व मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित तारपा वादक भिकल्या धिंडा, सुनील गायकवाड, प्रमोद अहिरे, प्राचार्य मोतीराम देशमुख, डॉ. मधुचंद्र भुसारे, तुकाराम चौधरी, देवदत्त चौधरी, प्रा. सुभाष कामडी, सुरेश पवार, चंद्रकांत घाटाळ, माया खोटरे, राम खुर्दळ, सिद्धार्थ जगताप, डॉ. जनाबाई वानोळे, भावेश बागुल, तानाजी सावळे, कवी राऊत तसेच सह्याद्री पर्वतातील आदिवासी बांधव व पत्रकार बंधू उपस्थित होते.
आदिवासी पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी पद्धतीने वरळी, नागळी, कंणसरा मातेचे पूजन व भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनाने करण्यात आली.
कथासंग्रहावर तज्ञांची मते
प्रस्तावित पाडावरचा टील्या कार तुकाराम चौधरी यांनी मांडला, तर सदर कलाकृतीचे विश्लेषण रवी बुधर, सुनील गायकवाड, संजय दोबाडे व राकेश वानखडे यांनी केले. सुनील गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रस्ते, सुखसोयी पोहोचलेल्या नसलेल्या भागात शिक्षणाने आदिवासी साहित्य डोंगर-दऱ्यातून उमलून आले आहे. या साहित्यामुळे आदिवासींचा हुंकार आणि दबलेला आवाज प्रकट झाला आहे.
आदिवासी साहित्याचे वाड्मयीन मूल्य
सुनील गायकवाड यांनी “इर्जुक” कथासंग्रहाचे आदिवासी साहित्य क्षेत्रातील वाड्मयीन मूल्य मोठे असल्याचे मांडले.
आदिवासी कवी संमेलन व आभार प्रदर्शन
कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी कवी संमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे आभार तारपा धूनचे संचालक मधु खोटरे यांनी मानले.