साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. मंगला रोकडे यांचा सन्मान

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. मंगला रोकडे यांचा सन्मान
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. मंगला रोकडे यांचा सन्मान

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. मंगला रोकडे यांचा सन्मान


मुंबई : साहित्य क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या सौ. मंगला रोकडे यांचा यंदा “व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक 2024” मध्ये त्यांच्या साहित्याच्या समावेशाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या रचनांमधून व्यक्तिमत्व विकासाचा विचार मांडत, समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलल्याबद्दल त्यांना तरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेतर्फे हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.

सौ. रोकडे यांच्या साहित्याची शैली आणि विचारसरणी वाचकांमध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे ध्येय त्यांनी जोपासले आहे. अशा प्रकारच्या लेखनाद्वारे वाचक वर्गाचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होऊन, समाजात जागरूकता वाढवण्यासाठी निश्चितच मोलाची मदत होणार आहे, असे संपादक मंगेश विठ्ठल कोळी यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रात सौ. रोकडे यांचा हा सन्मान कौतुकास्पद असून, त्यांच्या पुढील लेखनासाठी तरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

झाले हिचीच आभारी

📚✒️📚झाले हिचीच आभारी📚🖋📚
नित नियमाने माझी
घेते कविता भरारी
काय आषाढी कार्तिकी
हिची नित्याचीच वारी॥धृ॥
हिचे रसिक वाचक
सारे सह वारकरी
भाव अनुभवांचीच
हिची खिरापत खरी॥१॥
वेध रसिक मनाचा
हिच घेते नीरंतरी
मनी सार्यांच्या नांदते
भावरुप काव्यसरी॥२॥
माझी असूनही माझी
नाही राहते ही परी
जन्म घेते माझ्या उरी
राज रसिकांच्या वरी॥३॥
ठाव रसिक मनाचा
हिची घेते प्रतवारी
नाव हिच जन्मदेचे
इथे तिथेही उध्दारी॥४॥
तेंव्हा कुठे फुलतेही
माझी मानस-पंढरी
खुशी परिपूर्ततेची
अशी लाभते अंतरी॥५॥
पुरी होता हिची वारी
येते मनास उभारी
कशी मानू ही आभार
झाले हिचीच आभारी॥६॥
–निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव. खान्देश, महाराष्ट्र, भारत.
दूरध्वनी क्रमांक-९३७१९०२३०३.
📚✒️📚🖋📚✒️📚🖋📚✒️📚🖋📚✒️📚