ज्ञानदुर्गा नवरात्री घट
ज्ञानदुर्गा
॥सर्व मंगल मांगल्ये
ज्ञान सर्वार्थ साधिके
क्रांती जोति सावित्री
ज्योतिर्मयी नमतुस्ते॥
घट ज्ञानाचे स्थापूनी
गेली सावित्री माऊली
गोडी ज्ञान अमृताची
हिने आम्हास लाविली॥धृ॥
सारी जीवन सरिता
नावे शिक्षणा वाहिली
दुर्गा अंबा ही भवानी
सावित्रीच ज्ञानवाली॥१॥
दूर सारा ग अज्ञान
म्हणे सावित्री माऊली
मग जीवनी पहा ग
अहा ! सुखाची साऊली॥२॥
दुर्ग ज्ञानाचे उभारा
स्वर्ग येईल पाऊली
स्वर्ग दुजा न कोणता
म्हणे सावित्री माऊली॥३॥
भगिरथ प्रयत्नाने
हिच्या ज्ञानगंगा आली
ज्ञान अमृतात नारी
सारी आजही नाहली॥४॥
घट भरुन मस्तकी
ज्ञानगंगा साठविली
ज्योत अखंड ज्ञानाची
अशी तेवत राहिली॥५॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३