आठवण येणे जिव हुरु हुरु होणे

आठवण येणे जिव हुरु हुरु होणे
आठवण येणे जिव हुरु हुरु होणे

आठवण येणे जिव हुरु हुरु होणे

जिव हुरु हुरु होणे म्हणजे प्रिय व्यक्तीची आठवण येणे

॥ हुरु हुरु ॥

आठवण येणे जिव हुरु हुरु होणे
MK भामरेबापु


   

किती समृध्द आहे हो आमची मायबोली अहिराणी !

याचे एक ऊदाहरण देतो.

असं आपण म्हणतो.
हुरहुर म्हणजे प्रिय व्यक्तीची आठवण येणे व तिला भेटणेसाठी आतुर असणे.
पण
जेंव्हा आपल्या प्रियतम माणसाला भेटण्याची ओढ तीव्र होते तेंव्हा ती अवस्था दर्शवणेसाठी हुरहुर पेक्षाही प्रभावी शब्द अहिराणीत आहे.
तो म्हणजे हुरुहुरु !

माहेरवाशिन ला जेंव्हा आपल्या माहेरची खुप आठवण येते तेंव्हा
ती म्हणते
“आज मन्हा जीव भलताज हुरु हुरु करी र्‍हायना.”
म्हणजे मला आज प्रिय माणसांची खुप याद येतेय आहे,
भेटण्याच्या ओढीची जी अगतिक अवस्था असते त्यासाठी हा शब्द हुरु हुरु.

आज नेमके तेच झाले.
आमचे मित्र कमलशेठ भंडारी,प्राचार्य डाॅ.संजयकुमार बारी व मी
असे बसलो होतो.
का कुणास ठाऊक?पण आम्हाला हुरुहुरु वाटत होते.कारण आमचे चौथे मित्र गानुजींना भेटण्याची ओढ लागली.

भल्तज हुरुहुरु वाटे हो.,

हुर हुर वाटलं तर क्षणभर आठवण काढुन माणुस ईतरत्र रममाण तरी होतो व नंतर विसरतो,
पण
असे हुरु हुरु वाटलेवर त्वरीत भेटायला निघावेसे वाटले.
आम्ही तिघांनी ही तेच केले.
गानुजींचे नुकतेच बांधलेल्या अलीशान “रामालय” ला गाठले.

समोरच
“हे घर महाराजांचे आहे”
असा फलक त्यांनी लावलाय.
या महाराजात सर्व काही सामावलेय. गुरुंची भक्ती,राजेंची शक्ती .
पण
मला वाटते तेथे वास करणार्‍या मंडळींचे मनही महाराजाच !

त्यांनी मनापासुन स्वागत केले.

“उद्योगात शुन्यापासुन शिखरापर्यंतच्या प्रवासाचे गमक काय रे मित्रा?”

या आमच्या सवाल वर
“समर्पण”
हेच  साडेच्याराक्षरी उत्तर त्यांनी दिले.
आपल्या कार्यात समर्पण असले की सारे काही मिळते हिच गोष्ट गाणुजींनी सिध्द केलीय.
त्या मंगलमय वास्तुत प्रसन्नता व अध्यात्माची अनुभुती होती.
गुरुंप्रती श्रध्दा व रामाची भक्ती होती.
पण
खरं सांगु?
माणसांवर प्रेम करण्याची,
माणसाला माणुस म्हणुन वागवण्याची,
माणसांमध्ये देव पाहण्याची,मित्रांमध्ये रमण्याची,
दुसर्‍यांची मने जपण्याची,
भुकेल्याची भुक जाणण्याची,
गरीबाला देण्याची जी वृत्ती आहे ती महान आहे.
मित्रांच्या गोतावळ्यात भरभरुन बोलणारा हा मित्र म्हणून आम्हाला भावतो,
कुणाकडे जायला आम्हाला फुरसत नसतांनाही आमच्या मनात या मित्राविषयी हुरुहुरु वा हुरहुर वाटते हिच खरी या माणसाची पावती.
“आम्ही चहाला येतोय”
असं सत्तेने सांगता येणं हेच खरं प्रेम.

गप्पाटप्पा झाल्या.हुरहुर गेली.हुरुहुरु ही गेलं नि फ्रेश झालौ.
मस्तपैकी नाश्टा चेपला नि त्या अलीशान घराला बाय केले.

काश!
अशाच एकाद्या मित्राची अशी हुरहुर लागेल वा हुरुहूरु वाटेल तर  !
पहा बुवा,
कोणी सांगावं?
उद्या तुमचीही याद येईल. हुरुहुरु वाटेल.
मग आम्ही तुमच्या कडेही येवु.
तुम्ही फक्त नाश्टा तयार ठेवा ,म्हणजे झाले..

©MKभामरेबापु
 शिरपुर

मराठी कविता संग्रह (Marathi Kavita)

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *