श्रीराम नवमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा sri rama navami 2024
श्रीराम उजेड
राम पहाटे उठूनी….
मला भेटतो राम नाम
दमून थकून निघतो घाम
राम करुनी घेतो काम..!
देवी सीता माय…….
जगी आदर्शांची शाळा
राम घेऊनि हृदयाशी
आई लावीतसे लळा..!
सीता माईचे राम….
जग कोरत गेलं नाव
राम राम पेहरीत
उगवती पवित्र गांव…!
रामामृताचा पेला मुखे
जग पिवूनी घेती राम
सत मार्गाची संजीवनी
दुप्पट देती राम दाम!….
राम नामाचा रस्ता कठीण
अश्रू डोळे धुवूनी देती….
राम रस्ते चालत चालत
पवित्र तुळशी पाने वाहती!..
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११४२८
मो.नं-९९२३०७६५००
श्रीराम नवमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा
Pingback: ram kavita marathi रामराज वनवास - मराठी 1