रामराज वनवास ram kavita marathi
रामराज वनवास
राम राम म्हणू राम
रामराज इतिहास
राम राज्यात भेटला
सिताईला वनवास॥धृ॥
राम राम म्हणू राम
रामराज इतिहास
लक्ष्मणाच्या विरहात
भार्या उर्मिला उदास॥१॥
राम राम म्हणू राम
रामराज इतिहास
पुत्र शोकात राहिली
माता कौसल्या उदास॥२॥
राम राम म्हणू राम
काय आणखी शोकास
पुत्र शोक दशरथास
पत्करला स्वर्गवास॥३॥
राज्य नाही कैकयीच्या
लाभलेही भरतास
झाली म्हणून कैकयी
वर मिळूनि हताश॥४॥
राम राम म्हणू राम
रामराज इतिहास
भाग्य थोर पादुकांचे
राज्य लाभले जयास॥५॥
राम राम म्हणू राम
रामराज इतिहास
नाही केवळ रामास
अवघ्यांना वनवास॥६॥
राम राम म्हणू राम
रामराज वनवास
यावे पुन्हा रामराज
मग जन हो कशास॥७॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शबसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्शनी क्रमांक:-९३७१९०२३०३.

