happy birthday marathi kavita
वाढदिवस
लेखणीत उत्साह
प्रेरणा, कौतुक..वाह
निर्मळ मन
उधळती आनंदक्षण
प्रेमळ सावली
जणू माऊली
कामात तत्पर
नियोजनास कणखर
पाठीशी खंबीर आधार
मदतीला सदैव तयार
प्रामाणिकतेचे जपती तत्व
आदरणीय व्यक्तिमत्व..

शब्दप्रभू आदरणीय बापू..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात कायम येत राहो… आपणास निरामयी दिर्घायुष्य लाभो ही ईशचरणी प्रार्थना