marathi birthday kavita
झिमझिम धारा
अहा! सुटला पहा रे
सुसू सुसू पाणवारा
क्षणार्धात येतिलच
आता पावसाच्या धारा॥धृ॥
मला प्रिय याचा वारा
झिमझिमणार्या धारा
किती करु लोभ माझ्या
धराईचा हा सहारा॥१॥
जीव शिणले उन्हाने
प्रत्येकाला हाच प्यारा
याच्या येण्याने फुलेल
अहा! परिसर सारा॥२॥
करपल्या वृक्षवेली
बहरेल हा पसारा
हिर्व्यागार सृष्टीचा ह्या
मग पाहू या नजारा॥३॥
चोच भरुन पक्षांना
आता मिळणार चारा
बळीराजा च्या आशेला
आता लाभेल किनारा॥४॥
सुखावेल नेत्रसृष्टी
असा पाऊस हा प्यारा
याच्या झेलेन एकेक
मीही झिमझिम धारा॥५॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३

