पणती दिवाळी च्या मराठी कवीता

शुभ दीपावली
शुभ दीपावली

पणती दिवाळी च्या मराठी कवीता

पणती

उजळल्या दाही दिशा
उजळली ही धरणी
उजळले हे पर्व सारे
उजळली ही अवनी

उजळूनी केला क्षय
अंधाराच्या गर्वाचा
उजेडाने गेले भय
उदय प्रकाश पर्वाचा

बघुनी प्रकाश पर्व हे
मन माझे आनंदले
दिप दिप लागे अंगणी
अंधाराला झाकोळले

दिव्याचे दिव्यत्व हे
उजळवी मनाला
प्रकाशमान होऊनी
उजळावे स्वतःला

उजळले हे विश्व माझे
पेटली पणती अंगणी
उजळले नाते प्रेमाचे
आली दिवाळी सजूनी

कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर , धुळे.

शुभ दीपावली
शुभ दीपावली

दिपावली शुभेच्छा

दिपावली शुभेच्छा

आली दिवाळी दिवाळी
चंद्र चांदण्या आकाशी
पणत्या पेटल्या अंगणी
दिप राशींची नकाशी

सण मोठा मांगल्याचा
हर्ष उल्हास आनंदाचा
लक्ष्मी घरादारा येता
पाय लागे भाग्याचा

कर अष्टमीला आठ करवे
नैवेद्याला भाजी पुरीचे ताट
बसुबारस सणाला पुजले
गाय वासरूचा थाटमाट

धनाची पेटी घेऊन आली
लक्ष्मी धन त्रयोदशीला
नरका सुराचा वध केला
दिन नरक चतुर्दशीला

आली लक्ष्मी सोनपाऊले
दिप अवसेला लक्ष्मी पुजन
बली प्रतिपदा पाडवा गोड
शुभ मुहर्ताचा योग दिन

आली बहिण ओवाळाया
नाते प्रेमळ अतूट आस
भाऊ आतूर भेटायला
भाऊबीज सण खास

करू आनंदे साजरा
सण दिवाळी सोहळा
भेटीगाठी घेऊ सारे
देऊ शुभेच्छा सकळा

कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.

Happy Diwali
शुभ दीपावली

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन
गोवऱ्या    करोनी   जाळती /
ते  महा  लाभास  आंचविती /
शेणात आहे लक्ष्मीची वसती /
धर्मग्रंथाचेही वचन ऐसे..(ग्रामगिता)
म्हणूनच आम्ही शेतीला सशक्त करणाऱ्या उकिरड्यास, दिवा लाऊन लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला मनोभावे पूजतो.
उकिरड्याचेही पांग फेडणाऱ्या माझ्या बळीराजा…
भलेही उद्या येणाऱ्या,
तुझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रतिपदेला ठासून सांग…
दरवर्षी जरी ठेवला डोक्यावरी पाय…
तरी जिवंतच तो जगाचा बाप तोच माय…
लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना शुभेच्छा

शुभ दीपावली
शुभ दीपावली