बलिप्रतिपदाचा असा इतिहास झाला
बलिप्रतिपदाचा असा इतिहास झाला
वामनाने कट केला
बळी रसातळी नेला
सत्यानाशाचा बळीच्या
सण दिवाळीचा केेला॥धृ॥
भोळा भाबडा बळीही
बळी पडला कटाला
कार्य सिध्दीस गेल्याचा
हर्ष जाहला भटाला॥१॥
बळी लाखांचा पोशिंदा
त्याचा सत्यानाश झाला
खाल्ल्या अन्नाला ही नाही
भट वामन जागला॥२॥
बळी राजा भारताचा
याने ठेविला पदाला
बलिप्रतिपदा चा हा
असा इतिहास झाला॥३॥
खरा काय इतिहास
कधी कुणी न पाहिला
ज्ञानी असून मानसा
कसा अज्ञानी राहिला॥४॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शबदसृष्टी,प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
