अभिजात दर्जा
अभिजात दर्जा
ज्या ज्या संत महंतांनी आपल्या, ज्ञानेश्वरीतून, प्राकृत भगवत् गीतेतून, अभंगगाथेद्वारा, दासबोधातून, कथा-किर्तनातून, ग्रामगीतेतून त्या त्या काळी खरा देवधर्म, मानवतावाद व सामाजिक नितिमूल्यांचे सहज साध्या लोकवाङमयातून प्रबोधन केले, श्रद्धा व अंधश्रद्धा कशाला म्हणायचे यातील फरक लक्षात आणून दिला, सदाचाराचे बिजारोपण केले, वारकरी संप्रदायाचा पाया रुजवला, स्वच्छतेचा व शिक्षणाचा मूलमंत्र शिकवला त्याचा प्रचार व प्रसार केला त्या सर्वच संत महात्म्यांचा, समाजप्रबोधनकारांचा नामोल्लेख या अष्टाक्षरीतून करण्यात आलेला आहे! या सर्व संत महंतांच्या पावन स्मृतिंना विनम्र आभिवादन!
दिल्ली दरबारी गेली
हाक माय मराठीची
अभिजात दर्जा दिला
बाब महा गौरवाची
चक्रधर स्वामीजींची
ज्ञानदेव सोपानाची
निवृत्तीची, मुक्ताईची
संत नामदेव यांची
संत गोरा कुंभाराची
चोखामेळा, जनाईची
संतश्रेष्ठ तुकोबाची
संत दामाजी पंतांची
एकनाथ, तुकाविप्र
संत निर्मळामाईची
संत बंका भागुजींची
रामदास समर्थांची
देवभक्त रोहिदास
विसोबाजी खेचरांची
संत सखू, सोयराई
नरहरी सोनाराची
संत बहिणाबाईची
संत पाटील बाबांची
गजानन महाराज
श्री स्वामीजी समर्थांची
महाराज श्री शंकर
संत तुकड्यादासाची
संत बसवेश्वरजी
महाराज शंकराची
जनार्दन स्वामीजींची
संत गगनगिरींची
योगीराज गंगागिरी
संत गाडगेबाबांची
संत गोविंदगिरींची
महाराज वामनांची
संत भगवान बाबा
संत जुनदेवजींची
संत ब्रम्ह चैतन्यजी
संत बाळू मामाजींची
स्वामी शांतीगिरीजींची
सदगुरू मुळे यांची
महराज नरसिंग
संत गोंदवलेकर
आदि संतं महंतांची
गातो ‘किरण’ महती
मायबोली मराठीची
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.