नातं भावंडांचं भाऊबीज कविता

भाऊबीज
नाते बहीण-भावाचे जपावे निरामय भावनेने जसे जपले ज्ञानेश्वर अन् मुक्ताई माऊलीने...

नातं भावंडांचं भाऊबीज कविता

“नातं भावंडांचं”

नातं,मुक्ताई ज्ञानाचं ।
निर्मळाहुनी, अति निर्मळ ।।
नातं बहीण भाऊ,प्रेमाचं ।
जगी ते, धन्य आणि दुर्मिळ ।।
जपुन, या सर्व बंधनांना ।
निरामय,निरागस भावनांनी ।।
हळुवारपणे,जपले जसे ।
मुक्ताई आणि ज्ञानोबांनी ।।
असें व्यापावे, याच नात्यास ।
ममत्व,मायेच्या बंधुभावांनी ।।
असेंच वागावे, दारोदार ।
सर्वत्रच, भावा बहिनींनी ।।
अनुभवावे,अशा या प्रेमास ।
निःस्वार्थी,निर्मळ मनाने ।।
जसें,आपल्याच ओठास ।
आपल्याच,स्वतःच्या दाताने ।।
जरी चावा घेता,घेताच ।
संबंध सुधारावे,स्वतःच्याच जिभेने ।।

(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.-9403307521}

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा

भाऊबीज


              भाऊबीज
दिवाळीचा सहावा दिवस यमव्दितीया
बहिणीची भावावर अतुट माया

भाऊ असेल जरी मोठा राव
बहिणीशिवाय भावाला नाही भाव

प्रेम आणि विश्वासाच सुरेख नात
भावाचा बहिणीला मदतीचा हात

आपला भाऊ व्हावा  दीर्घाष्युशी
ओवाळी भावाला बहिण खुशीखुशी

बंध भावनांचे,वचन रक्षणाचे
अतुट नाते आयुष्यभराचे

भावाबहिणीची साथ आयुष्यभर असावी
दरवर्षी भाऊबीज उत्साहात साजरी व्हावी.

कवी-   मकरंद जाधव, नाशिक
संवाद- 9604153296

भाऊबीज
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा

चित्र-चारोळी,,
तुझ्या अंगणी सुखाची
  सदा व्हावी बरसात
औक्षण करते तुला
पाठी राहो तुझा हात

.. ……….दिनेश चव्हाण
        चाळीसगाव(जळगाव)
              9421516389

आला सण भाऊबिजेचा

कविता :-वासतव
आला सण भाऊबिजेचा

आला सण भाऊबिजेचा
कसं ओवाळू मी तुला
आई गेली बाप गेला
कशी येवू मी माहेराला

नाही राहीली आस मला
कसं सांगू बरं कोणाला
ना कोणाचा भाऊ ना वहीणी
कोण विचारेल या बहीणीला

झाली बहीण आता परकी
येते आठवण आई बाबाची
कधी कमी पडू दिलं नाही
ही व्यथा कोणा पुढे मांडायची

लेक मी लाडकी आई बाबाची
साथ असायची मला कायमची
गेली ती ही माहेरची मज्या
कधी नही आता माहेरला जायायची

कवी.दिलीप हिरामण पाटील
       कापडणे ता जि धुळे
      मो.नं.९६७३३८९८७३
ज्या बहीणीला भाऊ असून सुध्दा ओळखत नाही त्यांच्या साठी वास्तव व्यथा

दिवाळी
दिवाळी