छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रकलेतील योगदान
माझ्या प्रिय चित्रकार बंधू भगिनींनो नमस्कार!
व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी: छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रकलेतील योगदान
या डिसेंबर महिन्यात मी सत्याहत्तरी ओलांडणार आहे. मागील भिंतीवरील मी स्वतः काढलेले जगप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे, आणि त्याला बावन्न वर्षे पूर्ण झालेली आहेत. तरुण वयात वाचनाच्या प्रचंड आवडीतून अनेक महापुरुषांचे चरित्र अभ्यासले आणि त्यांच्याकडे प्रेरणादायी नजरेने पाहिले. यात प्रमुख असलेले छत्रपती शिवाजी महाराज, कुंतीपुत्र कर्ण, भगवान गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज आणि इतर मानवतावादी संत होते.

चित्रकलेचा प्रवास आणि प्रेरणा
माझ्या एकंदरीत अभ्यासानुसार, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात जन्म न झाला असता, तर भारत आजही गुलामीत राहिला असता. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्यावर इतका होता की, मी स्वतः त्यांची चित्रे काढून सन्मित्रांना त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सप्रेम भेट देत असे. जवाहरलाल नेहरू यांचे चित्र काढल्यानंतर एका मित्राने मला ५०० रुपये देऊ केले, पण मी ती रक्कम नाकारून प्रेमभावनेने चित्र भेट दिले.
चित्रांसोबतच्या आठवणी आणि काळजी
१९९७ मध्ये मुख्याध्यापक व प्राचार्य बनल्यानंतर चित्रकलेवर वेळ देणे शक्य झाले नाही, परंतु जुन्या चित्रांकडे पाहून आनंद वाटतो. संत मीराबाईचे वॉटरकलरने काढलेले एक चित्र उधळीने विद्रूप झाले होते, आणि त्याची आठवण मनाला चटका लावून जाते. कलाकाराच्या दृष्टिकोनातून चित्रे व्यवस्थित जपावी, ही माझी मनापासून विनंती आहे.
कला आणि जीवनाचे संघर्ष
छत्रपतींचे चित्र चाळीसगाव येथे आल्यानंतर त्याला अनेक संकटे झेलावी लागली, ज्यात माझ्या दोन अपत्यांचा व आई-वडिलांचा देहावसानाचा दु:खद प्रसंगही होता. तरीही हे चित्र माझ्यासाठी प्रेरणादायी राहिले.
माझ्या चित्रकार बांधवांना मानाचा मुजरा
चाळीसगाव येथील जगप्रसिद्ध चित्रकार के.के. मूस, धुळे येथील आप्पासाहेब विश्रमदादा बिरारी, जळगाव येथील लिलाधरजी कोल्हे, दिनेश चव्हाण आणि अन्य सर्वच चित्रकार बांधवांना मानाचा मुजरा करतो.
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव