ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे
कलाकार ते कवी
ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे
भाग.क्रं.(१)
कलाकार ते कवी खडतर जिवन प्रवास.ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे माझ्या जिवनात असे असे काही क्षण आले की जिवन जगताना खुपच दमछाक झाली.कापडणे गावात आल्यावर माझ्या आईस शेती विषयी काहीच कामधंदा माहीत नव्हता आजुबाजुच्या स्रीयांनी निंदनी टुपनी ची कामे शिकवली त्यातच कसेबसे जीवन जगायचो आम्ही त्यातच भाडेचेघर वडील ट्रकवर हमाली काम करायचे मोजकेच पैसे भेटायचे तेवढ्यावर घर कसे तरी भागवत त्यावेळेस मी शाळेत जातांना फाटकी चड्डी,फाटकं शर्ट, एखादं बाराखडीचं पुस्तक असायचं जवळ बस् तेवढं घेऊन आम्ही शाळेत जात अक्षरशा लाज वाटायची पण दिवस कठीण होते कसेतरी आम्ही दिवस जगून काढत होतो
आजही आठवतात ते दिवस मी साधारण बारा तेरा वर्षांचा असताना एकोणीसेआठ्यात्तर साली दुष्काळ पडला कारण की पावसाळा कमी झाला व जिकडे-तिकडे हाहाकार माजला आणि कामधंदा बंद पडला सरकारने दुष्काळ जाहीर केला.लोकांना कामधंदा नाही म्हणून हातोडी पार छिनी वाटप करण्यात आले मी आई वडीलांना सोबत धरणावर नालाबलडींचे काम व खडी फोडायला जात असत व कामाची हजेरी लावली जायायची दुपारी आम्हाला सुगडी दिली जात होती.
सुगडी खाऊन कसेतरी दिवस काढत होतो.आणि उदरनिर्वाह करीत होते.त्यावेळी रेशनचे लाल मिलो गहू व ज्वारी मिळत होती तेही डुक्कर खायाचे त्यावेळेस आपल्याला खावे लागत होते आणि ते घेण्यासाठी रात्री दोन वाजे पासून नंबर लावून रेशन दुकानाच्या पायरीशी तिथे झोपावे लागायचे तेव्हा सकाळी रेशन भेटायचे चक्कीवर दळण दळणून आणत व डब्बे घेऊन जायायचो तेव्हा दिवस भर खडी फोडत बसत हाताला मोठमोठे फोडे व्हायायचे तरी ते काम सोडत नसत थोडे फार पैसे भेटायचे आणि घर संसार चालवत असत थकून भागून आल्यावर निवांतपणे रात्री सर्वजन झोपी जायायचे असाही कठीण प्रसंग आजही आठवतो मला तो क्रमशा:
कलाकार ते कवी
भाग क्रं.(२)
कलाकार ते कवी खडतर जिवन प्रवास.ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील भाग दुसरा पुढे सुरू अशातच आई वडील मी कसे तरी जिवन जगत आणि ज्यांज्या खोलीत आम्ही भाड्याने रहात होतो. गुरव बंधू यांचा लग्नात मंगल वाजंत्री वाजवण्याचा व्यवसाय होता घराशेजारी मी त्यांच्या जवळ जाऊन बसत व त्याकाळी सनई चौघडा ,पेटी,संभळ हे वाद्य असायचे तेव्हा पेटीला हात लावून बघायचो.
असं करत करत मी पेटी वाजवू लागलो.मला ते लग्नात सोबत घेऊन जावू लागले काही दिवस झाल्यावर मला एकरूपया देत. मी त्याच्यात खुष होऊ लागलो. इथूनच मला वाद्य वाजवण्याची गोडी निर्माण झाली व मी कधीच मागे वळून पाहिले नाही तेथूनच मला सवय लागली व गरीबीची परिस्थिती असल्यामुळे जानं भाग पडलं आणि खेडोपाडी मी त्यांच्या सोबत जावू लागलो.
ते घरातील एक सदस्य म्हणून संगतीने घेऊन जात असत.आणि त्यांनीच परत एकोणीसे ऐयंशी ते एकोणीसे ऐकेय्यांशी च्या दरम्यान तीन चार जन मिळून बॅंड व्यवसाय चालू केला मी ही सतत त्यांच्या सोबत बॅंड वाजवण्या करीता जावू लागलो. जेव्हा लग्न तिथी नसायाची तेव्हा मी शाळेत पण हजेरी लावत. जसंतसं वय वाढत गेलं तसंतसं मी शिक्षण पण करत गेलो. आणि कालांतराने मी दहावीत शिकत असताना बोर्डाची परीक्षा करीता फि भरण्यासाठी पैसे नसत सुट्टीच्या दिवशी मी गारा मातीच्या विटा थापन्या साठी जात पन्नास रुपयात एक हजार विटा मी त्यावेळी थापत व दिवसभर गारा माटीच्या विटा करून करून खुप थकून जात होतो.
![कलाकार ते कवी ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00011359608807342367956-1024x768.jpg)
रात्री झोपताना खुप अंग अंग दुखत होते. पण काय करावं गरीबी आड येत होती. आणि शिक्षणाची जिद्द मनात असतांना दहावी पास होऊन अकरावी आणि बारावी उत्तीर्ण झालो पुढील शिक्षणासाठी मी नरडाणा येथे शिसोदे कॉलेजला कसे तरी ॲडमिशन घेतले पण नरडाणा येथे जाण्याकरिता पास काढण्यासाठी पैसे भेटत नव्हते. असातच माझी पुढे शिक्षणाची इच्छा अपूर्ण राहिली. आणि पुढील शिक्षण मी घेऊ शकलो नाही. असाही प्रसंगातून गेलो आहे.आजही प्रसंग मला आठवतो तो
क्रमशा: कदाचित आपण पहिला भाग वाचला असेल
भाग क्रं (३)
कलाकार ते कवी
कलाकार ते कवी खडतर जीवन प्रवास ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे भाग तिसरा पुढे सुरू
मी लहान पणा पासूनच बॅन्ड पथकात दोन रूपये रोजंदारी पासून ते आज पर्यंत ते सतत सातत्य टिकवून ईमान दारीने काम करीत आहे. मी कुठलीही लाज शरम न बाळगता पोटा पाणी साठी झटत आहे तेथून बैलगाडी,लोटगाडी,सायकल,व चारचाकी वाहन बॅंड ईथ पर्यत अजूनही प्रवास सुरूच आहे. आणि आज सुध्दा संघर्ष करीत आहे.
रिधम साहित्य कुठलेही मी वाजवतो व कुठल्याही बॅंड पथकात मी स्वता:जातीने लक्ष देत असतो माझी विचार सरणी ही खुप वेगळी आहे.कधीही मी कमी पणा वाटून घेतला नाही.समाज काय म्हणेल याची पण पर्वा केली नाही आणि सर्वांना सोबत राहून मी एक वेळेस कर्ज काढून स्वता:९५,९६मध्ये नटराज बॅंड पथकाचे मालक सुद्धा झालो होतो. पण पैसा कमी पडला कालांतराने मला माघार घ्यावी लागली होती.
![कलाकार ते कवी](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00026952123527179128490-768x1024.jpg)
बॅंड पार्टी बंध करावी लागली.मग मला छदं जडला तो भजन मंडळी सोबत टाळ वाजवण्याचा भजन गायणाचा तसेच २०१०पासून साहित्य लिहिण्याचामार्ग सापडला त्यात माझी पहिली अहिराणी कविता चप्पल चप्पल ही लिहिली व भजन अभंग भारूड गवळणी कानबाई गाणी अहिराणी मराठी कविता लिहिण्याचा छंद असून महाराष्ट्र गुजरात सिंधुदुर्ग गोवा दिल्ली इथ पर्यत मजल मारली आहे. कलाकार साहित्यिक म्हणून महाराष्ट्रात आजमितीस नावलौकिक झाले आहे.मला आता पर्यंत एकुण पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.यातच मला खुप समाधान आहे.
पुरस्कार
१)भारतीय दलीत साहित्यअकादमी महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिफ पुरस्कार नवी दिल्ली यांच्या हस्ते देण्यात आला
२) अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद युवक महोत्सव धुळे यांच्या कडून काव्यरत्न पुरस्कार
मा.संरक्षण मंत्री मा.सुभाष दादा भामरे यांच्या हस्ते देण्यात आला
३) राजमात जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार शाखा नवी दिल्ली जिल्हाध्यक्ष मालेगाव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला
४)राजनंदीनी फॉउंडेशन जळगाव यांच्या कडून साहित्य भूषण पुरस्कार मिळाला
५)श्री.गुरूसेवा प्रतिष्ठान यांच्याकडून सेवारत्न पुरस्कार मिळाला आहे.
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00045725539223655597640-1024x1012.jpg)
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00033880027315572834855-1024x768.jpg)
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00051106420214462787124-916x1024.jpg)
![कलाकार ते कवी ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00011359608807342367956-1024x768.jpg)
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00062539166052550276809-1024x379.jpg)
क्रमशः….
भाग क्रं (४)
कलाकार ते कवी
कलाकार ते कवी खडतर जीवन प्रवास ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे भाग चौथा सुरू वास्तव प्रसंग…
माझ्या आयुष्यातील हा शेवटचा खुप मोठा खडतर जीवन प्रवास. ज्यावेळेस सुख मला मिळायला लागले घरदार पक्क बांधून गाडी घोडी सर्व काही व्यवस्थित झालं.घरात दोन मुले कमवते मी व पत्नी असे सर्व परिवार आम्ही आनंदात जिवन जगत होतो. अशातच माझ्या आयुष्यात असा काही प्रसंग उद्भवला की त्याच्यातून बाहेर कसे पडायचे कळत नव्हते.
माझा लहान मुलगा याला अचानक ब्लड कॅन्सर झाला. आणि मग माझी पाया खालची वाळू सरकायला लागली.ब्लड कॅन्सर हे नाव ऐकुनच मी स्तब्ध झालो. नेमकं काय करायचं हेच मला उमजत नव्हतं. मी करावं काय हातात पैसा नाही. तर काय करावे धुळ्यातील डॉक्टर यांनी नाशिक येथील लोटसचे डॉक्टर यांच्या मार्फत मला याचे निदान सांगितले. त्यांच्या कडे चाचण्या करण्यातच व बेंगोलहून रिपोर्ट काढण्यातच पन्नास साठ हजार खर्च झाले. मग ते सांगतात की आमच्या कडे याचा ईलाज होणार नाही. मग मोठा प्रश्न हा उभा राहिला. कोणी म्हणे याला टाटाला न्या कोणी म्हणे बेंगलोरला न्या के. एमला. न्या अशातच मी पूर्ण खचून गेलो.
कसे तरी मला नातेवाईक यांनी मला एक दीड लाख रुपये जमवून दिले.ते घेऊन मी टाटा हॉस्पिटल मध्ये उपचारा साठी घेऊन गेलो व दाखल केले.आणि नवीन तपासणी केली.डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांनी मला खर्च सांगितला तुमचं पेशंटला एकूण खर्च एकवीस लाख रुपये लागतील.मी विचारात पडलो आता करायचे काय. दोन तीन दिवस टाटामध्ये कसं तरी आम्ही काढले.कारण पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध होणार नाही.आणि त्यातच पेशंटला वर घेऊन जानं चौथ्या पाचव्या मजल्यावर हे अशक्यप्राय होते. पेशंटला दरोज खाली वर करनं हे मुश्किल काम होतं.आम्ही विचार केला की आपण राहुलला येथून दुसरीकडे कुठे तरी शिफ्ट करायला पाहिजे.
![ह.भ.प.कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00033880027315572834855-1024x768.jpg)
आम्ही नाशिक येथे घेऊन जायला निघालो.मानवता हॉस्पिटल मध्ये सकाळी गेलो. तिथेही तपासणी केली डॉक्टरांनी मला विस लाख रूपये सांगितले.मी सांगितले की माझी येवढी पैसे खर्च करण्याची परिस्थिति नाही आहे.मी अक्षरशा रडलो त्यांच्याकडे पण कसं असतं मोठ्या दवाखान्यात त्यांना दरदरा येत नाही.तरी पण मी हिम्मत करून सांगितले जे होईल ते दि.७/९/२०२१रोजी त्यास दाखल केले गेले त्याचा इलाज चालू झाला.आणि पैसे इकडून तिकडून आणून वर्ष सहा महीने लोटत गेले.
तब्बेतीत थोडी सुधारणा झाली.बरं वाटायला लागले. एक दिड वर्ष तब्बेत चांगली राहिली.आणि पुन्हा तब्बेत बिघडली मानवता हॉस्पिटल डॉक्टरानी सांगितले आम्ही इलाज करू शकत नाही.मला परत प्रश्न पडला आता काय करावं. तिथून आम्ही घरी घेऊन गेलो.आमचे घरातील परिवार नातेवाईक जावाई मुलगी भाऊ भावजायी सर्व जमा झाले.परत त्यांनी पुन्हा मला नामको हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास भाग पाडले. कसे तरी पन्नास हजार रूपये घेतले सोबत मी व दहिवद अमळनेरचे मित्र आम्ही नामको येथे डॉक्टरांना जाऊन भेटलो सर्व कागद पत्र मागचे पुढचे पाहून सत्ताविस लाख खर्च सांगितला.आणि मग नका विचारू एक एक अश्रूं डोळ्यातून वाहवू लागले.मी कसेबसे डोळ्यातील अश्रूं पुसले मागचा पुढचा विचार न करता होकार देऊन टाकला शेवटी कसं असतं पोटचा गोळा खुप महत्वाचा असतो.
दि.२१/२/२०२३ रोजी नाशिक येथील नामको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आम्ही.मग चालू झाली टेशमेंट इलाज करता करता पैसे कमी पडू लागले. येवढे पैसे जमविणे सोपे काम नाही होते.मग व्याजाने भेटो बचत गटाचे साईबाबा फंडचे मुख्यमंत्री निधीचे तसेच मित्र मंडळी कवी मित्र साहित्यिक यांनी व गावातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक यांनी सुध्दा हातभार लावला तसेच फौजी बांधव गावातील परीसरातील पत्रकार बंधु यांनी प्रसिद्धी माध्यमा व्दारे बरीच मदत मिळवून दिली आणि मुख्यमंत्री सहायता निधि कडून मा.कुणाल बाबा यांच्या प्रयत्नाने दोन लाखाचा निधी मिळवून दिला.
गावातील राहुल चे मित्र यांनी गल्लोगल्ली फिरून सोबत डब्बा घेऊन पन्नास हजार रूपये जमवून ते थेट नामको हॉस्पिटल मध्ये घेऊन आले. त्यांनी आमच्या राहुलच्या हाती स्वाधीन केले. राहुल कडे त्याचे मित्र परिवार अक्षरशा रडत होते.आमच्या सोबत सदैव असायचा शांत स्वभाव कधी कुणाशी भांडण न करता रहायचा.देवाने कसे काय येवढे मोठं दु:खं त्याच्या वाटेला पाठवून दिले.सर्वजन आम्हाला समज देत होते.पण कसं आहे.आई बापाला येवढे मोठं संकट बघितले जात नव्हतं.असं करत करत चार सहा महीने लोटत गेले.त्याच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती. रात्री बे रात्री त्याचा ताप कमी होत नव्हता.
![कलाकार ते कवी](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/img-20240402-wa00045725539223655597640-1024x1012.jpg)
खानं कमी झाले.हे बघून आम्ही पूर्ण खचून गेलो.आणि एक दिवस मी डॉक्टरांना विचारणा केली. राहुल बरा होईल की नाही.मला शंका आली आणि त्यांनी मला सरळ सांगतलं की याचे ९०/टक्के चॉन्ससेस सुधारणा होण्याचे नाहीत.हे ऐकुन तर मी सुन्नं झालो.पण आता काय करू मी हे घरी कुणालाच याची वाच्याता केली नाही.मुलालाही कळू दिले नाही.
पत्नी मोठा मुलगा यांना पण सांगितले नाही.एक दिवस उगवला तो त्याची तब्बेत जास्तच खराब झाली.त्यास आय. सी.यु.मध्ये दाखल करण्यात आले. व्हेंटीलेटर वर ठेवण्यात आले. एक रात्र दिवस उजाडला आम्ही त्याच्याजवळ बसून होतो. तो बघत व बोटाने इशारा करायचा की मला इथून बाहेर काढा पण काढता येत नव्हतं.मी सांगितले याचं काही खरं दिसत नाही.त्याने सकाळी आमच्या देखत ७ वाजता प्राण ज्योत मालवली.दि.३०/६/२०२३ रोजी आणि मग हुदका दाटून आला.अनावर झाले अश्रू आवरणे मी बाहेर येवून इकडे तिकडे फोन लावले माझी पत्नी तिथे जवळ असून सुध्दा तिला दहा वाजेपर्यंत वार्ता लागू दिली नाही.
जवाई बापूना बोलवले.पुढची प्रोसेस साठी आम्ही हालचाल सुरू केली. नाशिक येथील नातेवाईक पत्रकार सुनिल वाघ कलेक्टर ऑफिस मधून आमचे जवळचे नातेवाईक आले. उरला प्रश्न डिस्चार्जचा पेंशट मेल्यावर सुद्धा डॉक्टर हे पैसे सोडत नाही.दोन दिवसाचे बिल हे ८०हजार रूपये काढण्यात आले अशा परिस्थितीत पैसे जवळ नाही आमचे पाहुणे माझे जवळचे मित्र यांनी फोन पे ने पैसे ट्रान्स्फर केले आणि मग चार पाच वाजेला पेशंटचा डिस्चार्ज केला गेला.
![मराठी व्यक्ति विशेष लेख](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/img-20240317-wa00146205532817443332885-820x1024.jpg)
![संत तुकाराम बीज](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/34f5db8b5a90c9bcbede67ac4c84e6994885556324689572568-1024x929.jpg)
आम्ही निघालो नाशिक हून गावात पोहोचलो सात वाजता बघतो तर काय सर्वीकडे शुकशुकाट पसरला होता.गावत सर्वी दुकाने रिक्षा स्टॉप बंद करण्यात आले होते.गल्लीत चौका चौकात मातंग पसरला होता.प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते सगेसोयरे हे ज्यांना जसं जसं माहिती मिळाली तसं तसं ते पण येवून गेली.आमची मुलगी तिरडी सोडत नव्हती आणि गावातील प्रत्येक स्री माणूस हे अश्रू गाळत होते.जणू काही त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य निघून गेला आहे.
तसेच माझ्यातील माणूस पण जणू मी हरवून बसलो.कुठलेच काही कळत नव्हते पत्नी तर दु:ख सागरात पूर्णता खचून गेली होती. संध्याकाळी साडे सात वाजता राहुल यास स्मशानात पोहचतं केलं सर्वांच्या साक्षीने बरीच मंडळीनी श्रध्दांजली वाहिली जो तो आपापल्या घराकडे परतली सर्वी मंडळी असाही हा माझा शेवटचा खडतर जीवन प्रवास अतिशय कठीण गेला. आज पर्यंत राहुलच्या दु:ख विरहात पूर्ण बुडवून गेलो आहोत आम्ही सर्व परीवारातील माणसं असाही प्रसंग आठवतो मला तो………. वास्तव जीवनात घडलेली सत्य घटना.
Pingback: मराठी कथा डिटॅचमेंट - मराठी 1
Pingback: महात्मा ज्योतिबा फुले - मराठी 1
Pingback: अनुभव मी अनुभवलेला प्रसंग कवी दिलीप हिरामण पाटील - मराठी 1