संत तुकाराम बीज

संत तुकाराम बीज
संत तुकाराम बीज

जगद्गुरु संत तुकाराम बीज

रामकृष्ण हरि पांडुरंग हरि
आज फाल्गुन वद्य-२-बुधवार
  जगद्गुरु संत तुकाराम बीज

संत तुकाराम बीज माहिती

आज रोजी संत तुकाराम महाराजांनी नांदुरकी वृक्षाजवळ सदेह वैकुंठ गमन केले
तुका आकाशाएवढे..का झाले?
माझा काही जगद्गुरु तुकोबांचा सुक्ष्म अभ्यास झाला नाही.तुकड्यातुकड्यांनी वाचन,श्रवण केले तेवढेच.तेवढ्याने मन सुन्न होवून जाते.चक्रावून जाते.आणि निःशब्दही.कारण “बौले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले” ही उक्ती स्वतःपासून सार्थ करणारे संत होते.त्याबाबत त्यांच्याशी निगडीत भरपूर आणि सत्य कथा आहेत.

त्यांतील एकच लिहीतो जी तुम्हालाही माहित.त्यांची सावकारी होती.पार खापरपंजोबापासून अनंत पिढ्यांची होती.त्यांच्याकाळी भयंकर दुष्काळ पडला.भूकबळी होऊ लागलेत.हे पाहिल्यावर,”अंतरी कळवळा,जनाचे दुःख देखवेना डोळा”.करत तुकोबांचे डोळे पाणावले.कुटुंबियांची सहविचार सभा घेतली.व त्यांच्या हिश्याची कर्ज खते जी अंदाजे २५बैलगाड्या भरतील एवढी होती.ती सर्व त्यांनी इंद्रायणीत बुडवून दिलीत.संबधितांना कर्जमुक्त केले व गहाण ची नहाण[सावकाराची मालमत्ता झालेले]झालेल्या सर्व वस्तुही ज्याच्यात्यांना परत केल्या.अशा या महान संतावर इंद्रायणीची कृपा झाली म्हणून तर बुडालेल्या गाथा पुन्हा वर आल्या.

ज्ञानदेवे रचियेला[आध्यात्म्याचा]पाया,तुका झाला कळस.हे अगदी खरं आहे.पण हा सन्मान त्यांनी स्वकर्तृत्वाने व बोले तैसा चाले प्रमाणे जगले म्हणून मिळविला.

संत तुकाराम बीज
संत तुकाराम बीज

संत तुकाराम महान संत

संत तुकाराम वा कोणतेही महान संत पंचमहाभूतांची मागणी म्हणून समाज स्वास्थ्य अबधित ठेवण्यासाठी ,ते दिर्घ काल यासाठी स्थलकालपरत्वे अवतरतात.थोडे विषयांतर करतो,तेराव्या शतकात या महाराष्ट्रात यादवकाल लयाला गेल्यावर चौफेर अंधकार पसरला व अशा वेळी एक ज्ञानतेजस्वी शलाका आळंदीला अवतरली व भागवत धर्माचा पाया रचला गेला व तो कोणी रचला हे सर्व ज्ञात आहे.

त्या पायावर चंदन शिंपण्याचे काम संत नामदेवांपासून सोळाव्या  शतकाच्या अंतापर्यंत म्हणजे संत एकनाथांपर्यंत मजबूत होत गेला पण यवन,फिरंगी ,घरभेदी,पाटील,मनसबदार यांनी अंधार अजून गडद केला,संत एकनाथ महाराज अंतर्यामी होते त्यांनी त्या उत्तर काळांत संत ज्ञानेश्वर महाराजांची ‘संजीवन समाधी’जी काळाच्या ओघात नबेदा म्हणजे दृष्टीपथात राहीली नव्हती ,ती त्यांनी उजेडात  आणली.ते अनुष्ठानाला बसले व एकच मागणे केले या ‘श्री महाराष्ट्र लक्ष्मीला'”,बया दार उघड ,बया दार उघड,बया दार उघड”,त्यांच्या आर्त कळवळ्याने महाराष्ट्र लक्ष्मी त्यांच्या समोर साक्षात प्रकट झाली,म्हणाली बोला,काय पाहिजे?महाराज म्हणाले ,”महाराष्ट्र धर्माची पुनर्स्थापना होण्यासाठी “संस्कार,भक्ती,शक्ती , युक्ती” “यांना पाठव.महाराष्ट्र धर्म कात टाकेल ,स्थापना होईल,वृध्दींगत होईल,तथास्तु म्हणून श्री महाराष्ट्र लक्ष्मी अंतर्धान पावली.


संत एकनाथांनी कृतार्थ मनाने समाधी घेतली.
सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात “संस्कार-राजमाता जिजाऊ,भक्ती-जगद्गुरु श्री संत तुकाराम,शक्ती-श्री संत रामदास,युक्ती-छत्रपती शिवाजी महाराज यांचा क्रमाने जन्म[प्रकटले] झाला.बाकीचे तुम्हाला माहित आहे.

तसेच घडले  या महाराष्ट्रदेशी ,संस्कार कसा द्यावा-असावा चे आदर्श  -राजमाता जिजाऊ, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले जगणारे व भक्ती कशी असावी याचे मूर्तीमंत -थोर संत  जगद्गुरू संत तुकाराम महाराज.तसेच भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला, त्या भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य तुकारामांचा जन्म,”समर्थाचिया सेवका,वक्र पाहे ऐसा जगी कोण आहे अशी शक्तीप्रवर्तक गर्जना,[“जय जय रघुवीर समर्थ” ]करणारे श्री संत रामदास महाराज,औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन युक्तीने आग्र्याहून करुन घेणारे विश्वश्रेष्ठ

छत्रपती शिवाजी महाराज हे त्रिदेव इथे जन्मले

असे तुकाराम महाराज “जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती”
प्रमाणे तुकोबांच्या सख्य भक्तीला जगात  तोड नाही.
हे सख्य पाहून तुकोबांच्या धर्मपत्नी रागाने “हा काळा विठ्ठल तुम्हाला का आवडतो एवढा?”तेव्हा तुकोबा म्हणत,”आवडे ,तुला पण तो आवडेल जर तू विठोबाला आर्तमनानै भजशील.
म्हणून उत्तर मिळते,”तुकाराम महाराज आकाशा एवढा जाहला.
अशा या जगद्गुरु तुकोबांबद्दल
कितीही लिहिल तरी कमीच.
म्हणून थांबतो पण एक आवाहन करतो की सगळ्यांनी  सोयीप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना वाचून काढावे.

शब्दांकन
प्रा.मगन सुर्यवंशी..डोंबिवली.
संपर्क संख्याः९७६९४६८३५८

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *