Sevapurti Sohala सेवानिवृत्ती
दुसरी इंनिंग आनंद देईल
नानाभाऊ माळी
सेवानिवृत्ती!... वर्तमान सेवेला विराम दिला जातो !अथक सेवेला निरोपाचां क्षण!……मनुष्य जन्माला आल्यापासून आपलं आयुष्य कुठेतरी बांधून घेतो!सेवेसाठी बांधलेलं आयुष्य पोटासाठी असतं!नोकरी ही बांधलेल्या आयुष्याचा केंद्रबिदू असतें!कुठेतरी खासगी, निमसरकारी,सरकारी अशी ती ठिकाणं असतात!नोकरीला सुरवात केल्यावर काही अपवाद वगळता सेवानिवृत्तीपर्यंत डबा बांधून पायपीट सुरू असतें!घर अन कामाचं ठिकाणं हेचं जीवन बनून जातं असतं!पळण सुरू राहतं!सहकारी आणि वरिष्ठांचें शब्द सांभाळून,मर्जी सांभाळून नोकरी सुरू असतें!कामावरील सर्व जेष्ठ, कनिष्ठ सहकारी नित्यनियमाने एकत्र येऊन दिलेलं काम उरकण्यावर भर देत असतात!आडव्या आकवर चाक फिरत राहतं!फिरतचं असतं!वेळ येण्याची वाट पहात चाक आकच्या आधाराने फिरत राहात!
दिवस,महिने,वर्षं जातात!भरभर सरसर मागे जात राहातात!कधी पावसात चिंब भिजतो,कधी ऊबदार थंडी असतें, तर कधी अंगाला, पायाला चटके देणारं उन असतं!नैसर्गिक आव्हानांना सामोरे जात कौटुंबिक अन कामातील आव्हानं देखील परीक्षा घेत राहातात!अशा अनेक आव्हानांना सतप्रवृत्तीने सामोरे जात घरदार नोकरी प्रवास सुरूचं राहतो!अन एक दिवस कळतो, उद्यापासून कामावर येऊ नका! ‘आता तुम्ही आनंदाने घरी आराम करा!’ असा हा निरोप मिळतो!निरोपाची कार्यवाही होते!सेवानिवृत्तीचें कागदपत्रे हातात पडतात!तो क्षण भरवलेला तेवढाच भविष्यातील चिंतेचा असतो!मन अस्थिर असतं!जर स्थिरस्थावर असतील तर निश्चिन्त असतं!
अशा चिंतनाच्या विषयाला भावनिक स्पर्श होतो तेव्हा प्रश्नांचा एक एक अर्थ उलगडू लागतो!’काल मी काय होतो!आज काय आहें!’ असं कळू लागतं!

काल दिनांक २८ मे २०२५ रोजी आमचे कवी मित्र बा.ह.मगदूम सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या रेल्वेखात्यानें निरोप समारंभ आयोजित केला होता!सरांची कवी,कादंबरीकार, कथाकार म्हणून महाराष्ट्राला ओळख आहें!पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील त्यांचं एक छोटंसं टूमदार गाव!सुरुवातीला सोलापूर रेल्वे डिव्हिजनमध्ये नोकरीला लागले होते!तेथून पुण्याच्या डिझेल लोकोशेडमध्ये बदली झाली होती!टेक्निकल अर्थात टेक्निशियन म्हणून रेल्वेत कार्यरत व्यक्ती लेखक असतो यावर विश्वास बसतं नाही!लोखंडाशी खेळणाऱ्या व्यक्तीच्या हातात लेखणी शोभून दिसेल? पण नेमकं तसंच आहें!म्हणजे तंत्र अन कला एकत्र नांदत आहेत याचा परिपाक आहें!कवी बा.ह.मगदूम सरांचं महाराष्ट्रात नाव लौकिक आहें!कामाचं स्वरूप तांत्रिक लेखक म्हणून सोनेरी शब्द कागदावर उतरत हृदयाला भिडणारे अनेक विषय मगदूम सरांनी हाताळले आहेत!असे हे निर्गवी कवी टेक्निशिय म्हणून रेल्वेत कामाला आहेत हे मोठं अभिमानास्पद आहें!
सर जन्माने मुस्लिम घरात मुसाल्मानीं भाषा! मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व बा.ह. मगदूम सर साहित्य क्षेत्रात ओळखलं जातं!अनेक कवी संमेलनातून,महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात कवी संमेलन होत असतात!सरांना हमखास पाहुणे म्हणून बोलावलं जात असतं!आई हा विषय अतिशय हृदयस्पर्शी, भावस्पर्शी…आपलं आयुष्य संपत जातं तरी आई विषय पूर्ण राहतो!आईवर, मातोश्रीवर त्यांच्या अनेक कविता आहेत!मुळात पहाडी आवाज!सादर करण्याची उत्तम जाण असल्याने त्यांच्या मुखातून कविता ऐकतांना रसिकजन मंत्रमुग्ध होऊन जातात!कविराज काल आपल्या रोजीरोटीच्या कार्यक्षेत्रातून ४० वर्षांची दीर्घ सेवा पूर्ण करून निवृत्तीच्या नव्या आयुष्याकडे वाटचालीस सिद्ध झालेले आहेत!
दररोज लोखंडाशी हात काळे करणारीं व्यक्ती कागदावर देखील भराभरा शब्द गिरवित असतात!आपल्या दैवी प्रतिभेतलें मोती सांडत असतात!नव विचाराचं सिंचन सुरूचं असतं!शब्दबद्ध कथा, कादंबऱ्या कविता जन्म घेऊ लागतात!कार्यस्थळ केंद्रातील सरकारी खात्यात रेल्वेमध्ये, जिथं हिंदी भाषा बोलली जाते!अनेकातून एकता साधणारा हा साहित्यिक काल सेवानिवृत्तीच्या समारोहात गळ्यातील झेंडूफुलांच्या माळेत उठून दिसत होते!अनेक वक्त्यांनी शब्द सुमनांनी त्यांचा गौरव केला! त्यांच्या कार्यगूणांची महती कळत गेली!
बा. ह.मगदूम सर नोकरीवर आत्मीयतेने प्रेम असणारे,कामावर जीव लावणारे!कवितेवर प्रेम करणारे!माणसातील देवत्व शोधणारे व्यक्तमत्व असून सतत प्रसन्नतेने जीवनाशी एकरूप झालेले आहेत!माणुसकीच्या हाकेसाठी व्याकुळ होणारं व्यक्तिमत्व ०१ जून २०२५ पासून भूतकाळ, वर्तमानकाळ यातून मार्ग काढीत भविष्यकाळाच्या वाटचालीची उत्सुक ओढ लागली आहें!तरीही प्रत्येक व्यक्ती आर्थिक बळ चांगलं असेल तर भविष्यात स्वप्न पहात आनंदाने जगत असतात!०१ जुनपासून *बा.ह.मगदूम सर* पेन्शन खात्यात बदली होतील!सगळं कसं एका क्षणात बदलून जात असतं!वेळ वाट पहात थांबलेली असतें!
सेवानिवृत्ती निमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा देत असतांना आपणास साठीनंतरचीं दुसरी इंनिंग उत्तम खेळायाची आहें!आपल्या लेखणीतून अनेक विषयांचां जन्म होणार आहें!आपल्या लेखणीतून पुन्हा इतिहास लिहिला जाणार आहें!मानवतेचा पूजारी शब्दवेली घेऊन भारतगाण करीत हिंडत राहणार आहें!आरोग्यसंपन्न आयुष्याच्या साथीने भावी आयुष्य रंगवणार आहात!माणुसपणाचे गोडवे गणारा कवी नव्या उमेदीने दुसरी इंनिंग खेळणार आहें!…अशा शुभेच्छा देत थांबतो!
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं -९९२३०७६५००
दिनांक-२९ मे २०२५