Marathi Kavita Aai

कादंबरी त्रिकोणातील वादळ पेलतांना
कादंबरी त्रिकोणातील वादळ पेलतांना

Marathi Kavita Aai

वात्सल्यसिंधू आई !!

वात्सल्यसिंधू आई माझी तू
दया,माया,ममतेचा सागर ही तू !!
गर्भातच संस्कार करूनी
प्रेमानं हितगुज करुनी
डोहाळे सारे तुझे पुरवुनी
आवड निवड माझी सारी जपुनी
असह्य प्रसुती वेदना साहुनी
जन्म दिला मला तू माऊली !!
कर्तव्यदक्षतेने तुझिया आई
उच्चपदी विराजमान झाले मी
सुसंस्कारांनी तुझ्या गं आई
दोन्ही कुळांची माझ्या शान वाढली
धन्य धन्य तू माय माऊली
माझ्या जीवाची तू गं साऊली !!
झाले बघ आता मी ही आई
माझ्या बाळाला जन्म देवुनी
तुझ्यासम माया ममता ही सारी
आली गं आई माझ्याही हृदयी
चिमण्या पाखराला या माझ्याही
वाढवीन मी ही जिवापाड जपुनी !!
झाले जरी आई मी गं मोठी
माया मूर्त तुझीच मी पाही
तुझी माया,ममता गं न्यारी
ना मिळे कधी कुठल्याही बाजारी
कसली ही उणीव नसली तरी
आई तुझ्याविना गं मी भिकारी !!
जीवनाची मम करुण कहाणी
कुणी पुसे ना तुज वाचुनी
येशील परतून कधी गं आई ?
सांग ना हळूच तू माझ्या कानी
तुझिया कुशीत सामावण्याची
आस पुरवाया पुन्हा तू ये ना आई
आई माझी !!

विमल प्रकाश पाटकरी
देवपूर,धुळे
मो.नंबर-9028055911

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
११.०५.२०२५

जगत जननी

जगत जननी

जगत जननी माय माऊली
तिच्या मुळे जग पाहिले
ती असते  ऊन सावली
नतमस्तक तीच्या मी वाहीले

सुख दुःख उभी राहते
नऊ महिने भार सोचते
तिच्या कर्जाचे डोंगर कधी फिटते
काटा मज टोचतो अश्रू तीचे वाहते

कधी अन्नपूर्णा होते
कधी सरस्वती अंगाई गाते
अग्निदेवता सहवासात राहते
कुशीत घेऊन नेत्रा पाळणा करते

दुःख  लपवते ढाल होते
सुगंध दरवळत घराला जोडते
अशी बलाढ रण रागिणी खेळते
माया ममता अफाट सागर होते

उरी माया  ममता राहता
आई विना जगता भिकारी
हीच अमुची संपती असता
पुढील जन्म  तुझ्या पोटी पुकारी

सविता पाटील मुंबई

मायची पुण्याई

मायची पुण्याई

माझ्या मायची काय सांगु पुण्याई
ऋणातुन तुझ्या मी कसा होऊ उतराई
  किती जरी मी मोठा झालो
  तुझ्यासाठी मी तान्हेबाळ
  येऊ दे कशीही परिस्थिती
  नाही तुटणार आपली नाळ
नऊ महिने पोटात तुझ्या मला गादीन् रजई
माझ्या मायची काय सांगु पुण्याई
 
तुच माझा भाव तुच माझा देव
  जरी असेन मी किती मोठा
  तुच माझे आभाळ
माझ पहिल संगीत तु गायलेली अंगाई
माझ्या मायची काय सांगु पुण्याई
 
तुच माझी दुनिया तुच माझा गाव
तुच माझे जग तुच माझी सोय
मिळतील किती सुखे पण त्याला
तुझ्या कुशीच्या उबेची सर येणार नाही
माझ्या मायची काय सांगु पुण्याई

रात्रंदिन माझ्यात तुझ्या प्रेमाची साठवण
  मी असेल दुःखात कि सुखात
  नाही येणार आठवण असे होणारच नाही
माझ्या मायची काय सांगु पुण्याई
तुझ्या ऋणातुन मी कसा होऊ उतराई.
           कवी
   मकरंद जाधव

आई

॥श्री॥

आई…

आई म्हणू किती मी, मन भरतच नाही
प्रेम स्वरूप आई,तू धन्य आहे आई…

देऊ मी काय उपमा देवाहूनी तू थोर
स्थापून तुजला आई, तो झाला बिनघोर..

तो भरवसा तुझाच, विश्वास शब्द तूच
तुजहून नाही कोणी जगती कुणीही उंच…

असतील शिखरे कोणी तू सप्तस्वर्ग आई
विश्वात तुजपरीस कोणीही थोर नाही..

नि:स्वार्थ म्हणजे काय? तुज पाहूनी कळावे
देवालयी न जाता पदकमल तव धरावे…

तू असते तोवरी ग नसते कुणास भान
जाता उडून पक्षी,जाते घराची शान…

सारे उजाड रान, मन पोकळीच होते
आई शपथ आई,ती भरून कधी न येते..

देवालयी न देव ते भग्न अवशेष
तुज स्थापिली घरात बदलून त्याने वेष…

जाताच तू उडून मी सैरभैर झाले
ते आठवांचे पक्षी बघ आसवात न्हाले…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ११ मे २०२५
वेळ: सकाळी ९/३४

मातृदिना निमित्त

मातृदिना निमित्त

१०० वर्षांची गॅरंटी देणारा 
॥ ये कौन मुर्तिकार है?॥

        ——©MKभामरे

कोंड्याचा मांडा करुन स्वतःच्या पोटाची खळगी भरणारी माय,
पण
आपल्या ऊदरात दूरवर लपलेल्या गर्भाशयात अशी काही मुर्ती साकारते ,
की जी १००वर्षांपर्यंत सहीसलामत असते.
जगातल्या कुठल्याही कारखान्यात तयार होणार नाही अशी मुर्ती ती साकारते…

त्या मायचा,आईचा,मातेचा,मम्मीचा,माॅमचा,मदरचा,माडीचा,माॅं चा आज दिवस..
  मातृदिन !
आई आणि बाप नावाचे हे रंगारी
आपल्या सहजीवनातुन जन्माला घालतात ती अर्भक रुपी नाजुकशी मुर्ती.
अनोखी,अनाकलनीय,शाश्वत व १०० वर्षांच्या वाॅरंटी गॅरंटी सह.
त्या अर्भकाला प्राणापलीकडे जपतात.त्याला रफ् न् टफ् बनवतात व दुनियेच्या मार्केटमध्ये सिध्द करतात.
शरीराचा कण् न कण् ,शरीराचा अणु रेणु तर सक्षमच परंतु मनरुपी साॅफ्टवेअर असा प्रभावी की ते क्षणात अनंत आकाशात तर क्षणात अथांग सागरात भरारी घेते.
दवाखान्यात गेल्यावर कळते की आपल्या मातेने गर्भात असतांनाच आपल्या शरीराची रचना व ठेवण किती कुशलतेने घडली आहे.
तेथे कळते की या शरीराचा एकेक पार्ट किती अनमोल असतो तो,
नाक,कान,डोळे,मेंदु किती सुक्ष्मपणे घडवते ती.
हातापायांना किती मजबुत व कणखर बनवते ती,
आणि
सारं सारं सारं
मोफत मोफत मोफत
अशा या रंगारीला नमन करण्याचा आज दिवस.
हे माॅं तुझे सलाम..

कसे मानु तुझे उपकार
गं हे आई
तुझ्या शिवाय जगात
श्रेष्ठ दुसरे नाही

तुच माझी असतेसुगंधी
जुई आणि जाई
तुझ्या चरणी ठेवतो माथा
तुच माझी विठाई

     ——©MKभामरे बापु

नारीशक्ती