कविता होळी उत्सवाच्या होळी कविता मराठी
कविता होळी उत्सवाच्या
होळी आली होळी आली
नववर्ष नवरंगी
एक रंग होळी झाली
होळी आली होळी आली
गीतं रंगात नाहली॥धृ॥
हिच्या शृंगाराची बाई
नवी कहाणी नवेली
जुन्या पाला पाचोळ्याची
धुनी पेटवित आली॥१॥
नवी कोवळी पालवी
अन् पालवित आली.
वसंताच्या स्वागताला
धरा फुलूही लागली॥२॥
वसंताच्या चाहुलीने
वसुंधरा ही फुलली
लाल पांढरी पिवळी
फुले हिने फुलविली॥३॥
नववर्ष स्वागताला
पहा उताविळ झाली
आला आंब्याला बहार
कुहू कोकिळा बोलली॥४॥
कोकिळेच्या स्वरासवे
सारी दुनिया डोलली
हिच्या बोलीनेच गोडी
साखरेत ही भरली॥५॥
गोड गोडुली साखर
पुरणात मिसळली
जशी आली तशी होळी
अशी पुरुन उरली॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
मराठी कविता संग्रह (Marathi Kavita)
कुणी म्हणे आली होळी
होळीबाई कां गं हवी
तुला पुरणाची पोळी
तुझ्या साठी जाते बघ
बळी पोळी साधी भोळी॥धृ॥
अन्न पिकवितो बळी
खेळ त्याच्याशी कां खेळी
पूर्ण ब्रम्हाचा निर्माता
तरी रिती त्याची झोळी ॥१॥
ज्वाला तुझी भिडते ग
अतिउंच त्या आभाळी
सांग त्याची पावसाला
ओठी आलेली आरोळी॥२॥
पाला पाचोळ्याची करा
करा हवी तर होळी
गरीबाच्या मुखी घाला
तिची पुरणाची पोळी ॥३॥
तुला पाहून स्मरते
दंगलीच्या जाळपोळी
नांव तुझे ग होलीका
कुणी म्हणे आली होळी॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७ अ,नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
होळी आली होळी आली
होळी आली होळी आली
नववर्ष नवरंगी
एक रंग होळी झाली
होळी आली होळी आली
गीतं रंगात नाहली॥धृ॥
हिच्या शृंगाराची बाई
नवी कहाणी नवेली
जुन्या पाला पाचोळ्याची
धुनी पेटवित आली॥१॥
नवी कोवळी पालवी
अन् पालवित आली.
वसंताच्या स्वागताला
धरा फुलूही लागली॥२॥
वसंताच्या चाहुलीने
वसुंधरा ही फुलली
लाल पांढरी पिवळी
फुले हिने फुलविली॥३॥
नववर्ष स्वागताला
पहा उताविळ झाली
आला आंब्याला बहार
कुहू कोकिळा बोलली॥४॥
कोकिळेच्या स्वरासवे
सारी दुनिया डोलली
हिच्या बोलीनेच गोडी
साखरेत ही भरली॥५॥
गोड गोडुली साखर
पुरणात मिसळली
जशी आली तशी होळी
अशी पुरुन उरली॥६॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
कुणी म्हणे आली होळी
कुणी म्हणे आली होळी
होळीबाई कां गं हवी
तुला पुरणाची पोळी
तुझ्या साठी जाते बघ
बळी पोळी साधी भोळी॥धृ॥
अन्न पिकवितो बळी
खेळ त्याच्याशी कां खेळी
पूर्ण ब्रम्हाचा निर्माता
तरी रिती त्याची झोळी ॥१॥
ज्वाला तुझी भिडते ग
अतिउंच त्या आभाळी
सांग त्याची पावसाला
ओठी आलेली आरोळी॥२॥
पाला पाचोळ्याची करा
करा हवी तर होळी
गरीबाच्या मुखी घाला
तिची पुरणाची पोळी ॥३॥
तुला पाहून स्मरते
दंगलीच्या जाळपोळी
नांव तुझे ग होलीका
कुणी म्हणे आली होळी॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं. ७ अ,नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
बात एकच सांगते
बात एकच सांगते
काय हवे होळी तुला
पाचोळ्याचे घे पैंजण
सळसळ सुळसुळ
ऐक स्वरांचे गूंजन॥धृ॥
समर्पित होता होता
जणु फेडतेही ॠण
गाते जशी का कोकिळा
गमे मधूर ती धून॥१॥
वृक्ष वल्लरी जीवन
नको जाऊस घेऊन
जीवनाचं वरदान
नको लावू उधळून॥२॥
तुझे होतसे स्वागत
पुरणाच्या पोळीतून
गोडी पुरणाची जाते
तुझ्या ज्वालेत जळून॥३॥
सांग लागते का गोड
तुझ्या सवे करपून
सरपण ही जाते ग
तुझ्या साठीच संपून॥४॥
बात एकच सांगते
दोन्ही हात जुळवून
घास गरिबा मुखीचा
नको घेऊ हिरावून॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७ अ,नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
काय हवे होळी तुला
बात एकच सांगते
काय हवे होळी तुला
पाचोळ्याचे घे पैंजण
सळसळ सुळसुळ
ऐक स्वरांचे गूंजन॥धृ॥
समर्पित होता होता
जणु फेडतेही ॠण
गाते जशी का कोकिळा
गमे मधूर ती धून॥१॥
वृक्ष वल्लरी जीवन
नको जाऊस घेऊन
जीवनाचं वरदान
नको लावू उधळून॥२॥
तुझे होतसे स्वागत
पुरणाच्या पोळीतून
गोडी पुरणाची जाते
तुझ्या ज्वालेत जळून॥३॥
सांग लागते का गोड
तुझ्या सवे करपून
सरपण ही जाते ग
तुझ्या साठीच संपून॥४॥
बात एकच सांगते
दोन्ही हात जुळवून
घास गरिबा मुखीचा
नको घेऊ हिरावून॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७ अ,नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
चारोळ्या होळीच्या पोळीच्या
चारोळ्या होळीच्या पोळीच्या
१}होळी आली हिची गोडी
पुरणाच्या ग पोळीत
अन्न पूर्णब्रम्ह त्याची
गोडी जळते होळीत॥
२}पूर्ण ब्रम्हाचा निर्माता
कष्ट विचारा बळीला
पुरणाची गोड पोळी
मग अर्पावी होळीला॥
३}होळी आली होळी आली
करा स्वागत होळीचे
नैवेद्याला नको पण
बाई दहन पोळीचे॥
४}होळी आली होळी आली
करा स्वागत होळीचे
पोळी जाळण्याच्या आधी
कष्ट आठवा बळीचे॥
५}गहू डाळ आणि गूळ
भिडलेत आभाळीला
कशी देऊ पुरणाचा
बाई नैवेद्य होळीला॥
६}होलीकेच्या नैवेद्याला
माझी एकेक चारोळी
नाही देणार पण ग
हिला पुरणाची पोळी॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
Pingback: मराठी कविता (Marathi Kavita) कशी समजून घ्यायची माणसं - मराठी 16/03/2024
Pingback: मी भिडे वाडा बोलतोय मराठी कविता - मराठी 16/03/2024
Pingback: मराठी कविता (Marathi Kavita) वहिवाट - 16/03/2024
Pingback: मराठी कवीता पानगळीचा सडा - मराठी
Pingback: होळी कविता मराठी (Holi kavita In Marathi) - मराठी 1
Pingback: होळी बद्दल माहिती होळी हुताशनी पौर्णिमा - मराठी 1