मराठी कविता (Marathi Kavita) कशी समजून घ्यायची माणसं

मराठी कविता
मराठी कविता कशी समजून घ्यायची माणसं

मराठी कविता कशी समजून घ्यायची माणसं

कशी समजुन घ्ययची माणसं
काही साधी असतात
काही भोळी दिसतात
वागणं जरी चांगलं असलं
तरी रोज कितीदा रंग
बदलतात माणसं

स्वार्था साधण्यासाठी
होतो हात पुढे मैत्रीचा
स्वभाव नसतो खात्रीचा
काही जवळ करतात
काही दुर सारतात
नाते घट्ट जुळले तरी
का फसवतात माणसं

कळत नाही हेतू  मनातला
म्हणतात त्याला आतल्या
गाठीतला
काही खोट बोलतात
काही खरं भासवतात
  समोर दिसत असले तरी
का टाळत असतात माणसं

तोंडावर कौतुक करायचं
नंतर बरंवाईट बोलायचं
अशांना काय म्हणायचं
काही साथ देतात
काही हात दाखवतात
आपणचं त्यांना द्यायचं आणि
आपलंच दिलेलं खायचं तरीही
का जमवून घेत नाहीत माणसं

खोट्यांच्या गर्दीमध्ये
खऱ्यांचा निभाव लागत नसतो
जिथे तिथे लबांडाचा प्रभाव दिसतो
काही छळतात काही रडवतात
मदत गरजेची असते तरी
का माणुसकीने वागत नाही माणसं

या जगात
मुकं होऊन जगायचं
बहिरं होऊन रहायचं आणि
आंधळं होऊन चालायचं असत
काही गळाभेट घेतात
काही गळा कापतात
कोणी कुणाला आपलसं
करून घेतं नाहीत
मार्ग कष्टाचा असला तरी 
का वाट चुकवतात माणसं

अवतीभोवती चुकीची माणसं असतात
त्यांच्या बद्दल न बोललेलच बरं
त्यांच्या पासून चार पावलं
दुर राहिलेल खरं
मात्र एकच लक्षात ठेवायचं
जो टाळतो ना  त्यांच्या नादी
लागायचं नाही
आणि जो खरचं जीव लावतो ना
त्याला कधी सोडायचं नाही
कारण माणसं ओळखायला
माणसाचीच फसगत होत असते.

संजय धनगव्हाळ
अर्थात कुसूमाई
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

मराठी कविता (Marathi Kavita)

मी भिडे वाडा बोलतोय मराठी कविता

मराठी कविता होळी उत्सवाच्या

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *