पाऊसाच्या मराठी कवीता

पाऊसाच्या मराठी कवीता
पाऊसाच्या मराठी कवीता

पाऊसाच्या मराठी कवीता

येऊ म्हणतो वेळेत

    नको ठेवू रितेपण
येऊ म्हणतो वेळेत
यंदा प्रथम मान्सून
करु म्हणते स्वागत
       मीही त्याचे आनंंदून ॥धृ॥
लाखो झाल्या विनवण्या
थकले रे विनवून
आला मृग ही पावसा   
        येरे सार्या त्या मानून॥१॥
खुश होऊ देरे माझा
बळीराजा सुखावून
येवो बळीचे ते राज्य
       पुन्हा माघारी फिरुन॥२॥
आजवरी विवंचना
जारे बाजूस सारुन
कमी अन्नाची जलाची
       काढ आता रे भरुन॥३॥
येरे येण्याचे स्वागत
येवू नको अती पण
नको ठेवूस सार्यांच्या
         जीवनात रितेपण॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.
{कविता टाईप होता होताच पहिल्या पावसाचे आगमन झाले एरंडोल मधे.}

मराठी पाऊसाच्या कवीता
मराठी पाऊसाच्या कवीता

धरेवर पावसाचे

        गीत मातीत रुजले
धरेवर पावसाचे
आले पाऊल पहिले
आले पाऊल पहिले
        येता येता मी पाहिले ॥धृ॥
सव्वा शंभर गीतांची
मीही दिली भावफुले
अक्षरात गुंफिलेले 
         सारी माझी शब्दफुले ॥१॥
गंध भरता धरेने
भाव मातीत फुलले
गंधासाठी ह्याच धुंद
           मीही होते आसावले॥२॥
गीत नवे सुगंधाचे
मला लिहावे वाटले
शब्द माझे गंधवेडे
          गीत क्षणांत थाटले ॥३॥
गीत क्षणांत थाटले
अन् ओठात सजले
झिमझिम स्वरांसवे
           गीत मातीत रुजले ॥४॥
      निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव
दूरध्वनी क्र. — ९३७१९०२३०३.

Marathi kavita paus
Marathi kavita paus

पावसात एक एक

     तालावर त्या नाचावा
कवितेत माझिया रे
किती केला गवगवा
यावे वरुण राजे हो
            तृष्णा धरेची भागवा॥धृ॥
शब्द माझे सांगतात
आधी माणूस जागवा
पाणी पावसाच्या साठी
          झाडे लावा नि रुजवा॥१॥
मनी ध्यानी आणि स्वप्नी
वसे पावसाचा धावा
शब्दांसवे सरसर
        माझ्या पाऊसही यावा॥२॥
पावसात एक एक
भाव भावनांचा न्हावा
झिमझिम चा वाजावा
           अन् पावसाचा पावा॥३॥
मन भरुन ऐकावा
त्याचा झिमझिम पावा
रानी वनी जसा मोर
          तसा पाऊस नाचावा॥४॥
आनंदाने येरे ये चा
पाढा फिरुन वाचावा
मन-भाव अन् माझा
         तालावर त्या नाचावा॥५॥
   निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

Pavsachi kavita
Pavsachi kavita

आली पाऊस पाऊले

आली पाऊस पाऊले

       गीत धन्यते हर्षिले
आली पाऊस पाऊले
मन माझे उल्हासले
सवे सवे वसुधेचे
         उल्हासून ही हासले ॥धृ॥
कवितेचे माझ्या सवे
भाव तरंगी हासले
शब्द अक्षरी नाचले
           नवे काव्य रचियले॥१॥
मेघ नभात गर्जले
सरसर बरसले
तसे तसे गीत माझ्या
          ओठी सरसर आले॥२॥
माझे अंगण ओसरी
चिंब नाहले हर्षिले
सारे काही कवितेने
         विना सायास चर्चिले॥३॥
कवितेने चर्चियले
रसिकांसी ते अर्पिले
रसिकांसी ते भावले
            गीत धन्यते हर्षिले॥४॥
    निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,  प्लाॅट नं ७अ नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.

पाऊसाच्या मराठी कवीता
पाऊसाच्या मराठी कवीता

आला पावसा

आला पावसा

        तुझ्या येऊ दे सरीस
आला पावसा मिरिग
तुझ्या  येऊ दे सरीस
किती कसे बोलवावे
           सांग तुझिया सरीस॥धृ॥
कधी पाहिन तुझ्या मी
सरी मागून सरीस
सरसर झरझर
           येता येता धरतीस॥१॥
नको तेंव्हा गारपिटी
पिटलेस तू सृष्टीस
हवा तेंव्हा कसा नाही
              दिसतही रे दृष्टीस॥२॥
काय म्हणावे पावसा
तुझ्या अशा लहरीस
तरसलो आम्ही तुझ्या
               झिमझिम च्या सरीस॥३॥
रिमझिम वाजवित
येरे तुझ्या ‘बा’ सरीस (बासरीस)
सप्त सुरात न्हाऊ दे
            पुन्हा माझ्या धरतीस ॥४॥
     –सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.