सनातन हिंदु धर्माची ही शिकवण
एक संस्कृत सुभाषित आहे
👸🏻🫅🏻👧🏻👩🏻👸🏻🫅🏻👧🏻👩🏻
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
रमन्ते तत्र देवता: l
➿➿➿➿➿➿➿➿
एक संस्कृत सुभाषित आहे,
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: l
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्त्राफला: क्रिया: ll
सनातन हिंदु धर्माची ही शिकवण आहे. याचा अर्थ असा आहे, की जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवांचा वास असतो. पण जिथे स्त्रियांची पूजा केली जात नाही तिथे चांगली काम सुद्धा निष्फळ ठरतात.
या म्हणीचे तंतोतंत पालन खान्देशात केलेजाते. इथे सर्वात मोठे सण आहेत, आखाजी आणि रोट या दोन सणाला स्त्री पूजन होते.
आखाजी म्हणजे अक्षय तृतीयेला खान्देशात गौरी पूजन होते. ते कुठे महिनाभर कुठे 15 दिवस कुठे 7 दिवस. पण वैशाख द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. गौराई लेक आहे खान्देशची यावेळी सर्व लेकी माहेरी असतात. पार्वतीला खान्देशात, झणझणी माय सुद्धा म्हणतात. झणझणी माय म्हणजे जनतेला जन्म देणारी, जगत जननी.
खान्देशात दुसरा मोठा सण कानबाईचे रोट हा आहे. हा सण घरगुती 3 ते 4 दिवस साजरा करतात. सामूहिक कानबाई कुठे महिनाभर तर कुठे वर्षभर कायम स्वरूपी असते. कानबाई ही लक्ष्मी आहे. ती खान्देशची सून आहे. तिला घरी परणून आणावी लागते. म्हणजे लग्न लावून आणावी लागते. कानबाईच्या सणाला सर्व सुना सासरी असतात. पूर्वी खूप कमी वयात लग्न व्हायची. तेंव्हा समज येई पर्यंत मुली माहेरीच राहयच्या पण कानबाईचे रोट खायला या कोवळ्या सुना तीन दिवस सासरी जायच्या. कानबाई मूळ नारळ रुपात असते. नारळ हे लक्ष्मी नारायणाचे रूप आहे. आपण सत्यनारायण पूजा घालतो ती कळसावर नारळ ठेवून. नंतर हा कळस चौरंगावर ठेवतो. चौरंगाच्या चारही पायांना केळीचे खांब बांधतो. अगदी हीच आरास कानबाई पूजेला असते.
कानबाई (लक्ष्मी) रानबाई (भूदेवी) आणि कण्हेर राजा (कान्हा/विष्णु) अशा त्रिदेवांची पूजा खान्देशात करतात पण मुख्य पूजा स्त्री म्हणजे कानबाई रानबाईची असते.खान्देशात सर्वात मोठी यात्रा सप्तशृंगी मातेची असते. खान्देशात सामूहिक विवाहाची हजारो वर्ष जुनी परंपरा आहे. ती लग्न कानबाईच्या साक्षीने होतात. खान्देशात घरोघरी कुमारी बालिका पूजा केली जाते. म्हणुनच खान्देश देव भुमि आहे. कारण तिथे अग्र पूजेचा मान नारीला आहे.
जगभर अनेक रुपात, अनेक नावात आणि अनेक पद्धतीने देवीची पूजा केली जाते. पण तिची मुख्य रूपे तिनच आहेत. लक्ष्मी, पर्वती आणि सरस्वती. इस्लाम पूर्व काळात सुद्धा अरबस्थानात याच तीन देवींची पूजा अरबी लोक करत असत. त्यांची अरबी नाव होती, लटा (लक्ष्मी) उज्जा (उमा) मनाटा (मानसी/सरस्वती).

या तीन देवीच्या नावाचा अर्थ असा आहे, पर्वती ही युद्ध देवता आहे. म्हणजे ती संरक्षण करते. लक्ष्मी म्हणजे ही धनाचा साठा आहे. ती श्रीमंती आहे. सरस्वती म्हणजे कर्तव्य, म्हणजे कमाईचा मार्ग आहे. या तिन्ही गोष्टी ज्यांच्या कडे आहेत तो जगातील सर्वात सुखी माणुस!
खान्देशात या तीन देवीना काय म्हणतात बघा,
1 पार्वती-गिरिजा, गवराई, सत्तर सिंगी (सप्तशृंगी) झणझनी. एकोरा (एकवीरा), आनपूरना (अन्नपूर्णा)
2 लक्ष्मी-कानबाई, धनदानई, धनाई, रुख्खामाई, श्रीदेवी, घरातील धन, पैसा आडका, जड जवाहर इत्यादी.
2 भुदेवी-रानबाई, पेडकाई, पूनाई राई (वनराई) सत्यभामा, रानातील धन म्हणजे पीक पाणी, तुळस.
या व्यतिरिक्त ज्याच जे कमाईच साधन आहे त्याला ते सरस्वती म्हणतात. शिक्षकांना पाटी पुस्तक लेखणी सरस्वती आहे. नर्तकीला घुंगरू सरस्वती आहे. गाणार्याना, ढोलकी, तबला, हार्मोनियम ही सरस्वती आहे. अहिराणी भाषेत सरस्वतीला सारसता, सारजा म्हणवतात. तावडी भाषेत सरोसोती म्हणवतात. बहिणाबाई चौधरी यांनी हाच तावडी शब्द घेतला आहे.
महाराष्ट्रातही देवीची अनेक रूप आहेत. त्यांची भजन गाणी गायली जातात. पण एक सप्तशृंगी देवी सोडली तर खान्देशातील एकाही देवीचे नाव कोणी मराठी गाण्यात घेतले नाही.म्हणुन मग आपण *बापू हटकर प्रस्तुत खान्देश दर्शन* युट्यूब चॅनेलवर खान्देशची कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेचे मराठी गाणे गरबा चालीवर तयार करून टाकले आहे. या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात सर्व खांदेशी देवींची नाव घेतली आहेत. त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शक्तिपीठ प्रमुख देवी यांची सुद्धा नाव घेतली आहेत.
या सोबत एक लिंक पाठविली आहे. ती उघडा, त्यात खान्देश सहित महाराष्ट्रातील प्रमुख देवींची नाव घेतली आहेत. शिवाय महिषासुर जन्माची कथा आणि देवीने केलेला त्याचा वध ही गोष्ट सुद्धा सांगितली आहे. गाण आवडल तर सबस्क्राइब करा, लाईक द्या, आणि इष्ट मित्र, आप्त स्वकीय यांना फॉरवर्ड करा!
बापू हटकर