मराठी कविता संग्रह

मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह

मराठी कविता संग्रह

        पार गेलास बुडूनी
पैसा रुपया नि नाणी
सारी आम्ही बनवूनी
गेली कल्पित लक्षुमी
         श्रेय आमुचे घेऊनी॥धृ॥
झाला कागद रुपया
नाणी बनली धातूंनी
दाग दागिने बनले
     अति मौलिक धातूंनी॥१॥
अलंकार बनविले
स्वर्ण कारांनी श्रमुनी
मुर्ख आम्हा बनविले
    लक्ष्मी यांस संबोधुनी॥२॥
कलावंत झाले शुद्र
देवी लक्ष्मीस स्मरुनी
जन्मदाते खरेखुरे
   हिचे आम्हीच असुनी॥३॥
गृह लक्ष्मीला ठेविले
दासी पायाची म्हणुनी
गुण तिचे ना कुणीही
      देखियले पारखुनी॥४॥
श्रम झाले श्रमिकांचे
लक्ष्मी झाली केरसुणी
आम्ही श्रमही आमुचे
    लक्ष्मी राहिलो बनुनी॥५॥
कधी पाहशी माणसा
दोन्ही डोळे उघडूनी
तूच तुझ्याच देशात
       पार गेलास बुडूनी॥६॥
     निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.

मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह

[प्रकाशित कविता संग्रह नारी तुझी कथाच न्यारी मधून…]
     🪔🧹🗑केंव्हा मिळावी मान्यता🗑🧹🪔
जन्म सरे केरसुणी
केर काढता काढता
नांव तुझे ही ग लक्ष्मी
       भाळी झिजण्याची व्यथा॥धृ॥
नाव माझे ही ग लक्ष्मी
तुझी माझी एक कथा
तुही सरते झिजता
          तीच माझीही ग व्यथा॥१॥
लक्ष्मी म्हणूनी ग सारे
आम्हा फुलवुनी देता
आम्ही मानतो त्यातच
           जीवनाची ग धन्यता ॥२॥
जन्म सरले केंव्हाच
सात झिजता झिजता
किती काळ मानावी ग
             आम्ही यात सार्थकता३॥
तुझ्या माझ्या जीवनाची
कुणी लिहिन का कथा
तेंव्हा समजेन मीही
              आहे जरा मानवता॥४॥
आम्हा वाचून जग हे
सुने होईल अन्यथा
स्री ला मानव म्हणूनी
       केंव्हा मिळावी मान्यता॥५॥
   –निसर्ग सखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
  🪔++++++ 🪔 +++++++++🪔  +++++++🪔

मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह