मराठी कविता पक्षफोडे

मराठी कविता पक्षफोडे
मराठी कविता पक्षफोडे

मराठी कविता पक्षफोडे

      पक्षफोडे

सांगा साहेब देशात
कुणी घातला घोळ
राजकीय पक्षांचाही
केला पूर्ण बट्टयाबोळ..!

खरे होते जुने नेते
पक्षनिष्ठा पाळणारे
कोण आहेत बोला ते
उभा पक्ष फोडणारे..!

खोकेबाज असूनही
चोर तुम्ही थोर केले
खरे पक्ष संस्थापक
थोर तरी चोर केले..!

साम,दाम,दंड,भेद
नीती का वापरतात ?
पक्षांसह चिन्हेसुध्दा
कश्यापायी चोरतात ?

भाषा तुमची असते
घाण अन् शिवराळ
गुरु आहे का तुमचा
कृष्णद्वेषी शिशुपाळ ?

सारे कट्टर विरोधी
पक्ष फोडून आणले
भ्रष्ट्राचारी निर्लज्जांना
कसे सहज धुतले ?

अन्नदात्या पोशिंद्याने
काय अपराध केला
भाव न देता पिकाला
तुम्ही बरबाद केला..!

बघा तुम्ही पुढे आता
ठेचू आम्ही पक्षफोडे
अनं त्यांच्यासवे गाडू
घरभेदी पक्षसोडे..!

नका समजू साहेब
तुम्ही स्वतःला शिकारी
मतदार राजापुढे
मोठा नेताही भिकारी..!

     सुगंधानुज
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

मराठी कथा डिटॅचमेंट
मराठी कथा डिटॅचमेंट

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *