जागतिक रंगभूमी दिन
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कविता
रंगभूमीचे रंगकर्मी
रंगभूमीच्या रंगमंचावर
रंगकर्मी दाखवतात
विविध रंगछटांनी सजवलेल्या
आत्मसात केलेल्या रंगछटा
रंगवतात रमवितात स्वतःला
आणि
रसिक प्रेक्षकांचे
मनोरंजन करतात
त्यांच्या आयुष्यातील
खल विचारांचे दुःखाचे
मळभ दूर सारून
सुखाच्या दिशेने
वाटचाल करण्यासाठी
जीवन सार्थकी व्हावे
मनातील विचारांना
करमणुकीच्या माध्यमातून
सत्कर्मी सत्कारणी वळण
लागावे म्हणून…
रंगभूमीचे रंगकर्मी
मग्न होऊन रमत असतात
आपल्याच भूमिकेशी
एकनिष्ठ होऊन
रंगभूमीच्या रंगमंचावरून
रसिकप्रेक्षकांना रिझवण्यासाठी
आपल्या स्वत्वाचा कस लावून
गाजवतात
रंगभूमीचे रंगमंच.
कवी
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
7588318543.
8208667477.