मराठी गझल माझी बोलते

मराठी गझल
मराठी गझल

मराठी गझल

गझल माझी बोलते

जन्म तुला हा एका स्त्रीने माणसा दिला
वासना नव्हे उपासनेचा वारसा दिला

भंगले तरी स्वर्ग घराचा करते नारी
मोलाचा हा संदेश किती छानसा दिला

शब्द बोलणे,सत्य वागणे तीच शिकविते
संस्काराचा तिने मुलांना आरसा दिला

कसे जगावे,कसे मरावे राष्ट्रासाठी
होत जिजाऊ माऊलींनी हा वसा दिला

सिद्ध स्वतःला नारी करते रोज तरीही
तिला नरांनी सन्मान कुठे फारसा दिला ?

सुगंधानुज
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.