चिरफाड
चिरफाड
पाहताच फोटो तिचा
वेगात दौडले विचार दहा
आणिक सोबतीला सहा
दहा धावले अहंकारी दशाननाचे
आणि सहा टपून होते षडरिपूंचे
सारेच म्हणती मजला ,
पहा तो फोटोतला चेहरा
किती सुंदर दिसतो अन्
तू तर त्याच्यापुढे वानर वाटतो
घे न्याहाळून
डोळे जातील दिपून
नयन सुखाचा आस्वाद घे
आणि जाऊन पहा तिला
प्रत्यक्षात जवळून. ….
मी म्हणालो,
फोटोत असेल जरी ती दिसतेय सुंदर
तरी
नकोच मला ती आणि तिचा चेहरा
मग त्यांनी मला वेड लागे तोवर
माझा पिच्छा पुरवला
सारखे सारखे नजरेसमोर आणून
तिला कधी विचारात
तर कधी स्वप्नात
मला तिचाच ध्यास लावला
आभासी दुनियेतून बाहेर पडायला
मला थोडा त्रास झाला
पण मी निश्चयाचा पक्का होतो
म्हणून माझ्या स्वतःच्या
एकाच विचाराशी ठाम करार केला
त्यानेच मला तारले
म्हणाला,….
अशा कितीतरी सुंदऱ्या रोजच
तुझ्या अवतीभवती फिरत असतात
त्यातीलच ही एक आहे असे समज
ज्या माऊलीने तुला जन्म दिला
ज्यांची सोबत रोजच असते
त्या बहिणी वहिनी लेकी आया बाया
आणि
जन्मभराची सोबतीन बायकोकडे बघ
जमलेच तर सुखी संसारात जग
ह्या एकाच विचाराशी सहमत होऊन
मी फोटोची चिरफाड केली ……
कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
7588318543.
आयुष्य
आयुष्य
शेवट हा आयुष्याचा
की ही सुरवात आहे
मन माझे माझ्या मनाला
हे पण विचारून पाहे
आयुष्यावर बोलू काही
मनात विचार येतात तेही
आयुष्य निघून जाते सारे
मनातले विचार मनातच राही
जीवन जगताना
संकटेच अमाप येतात
सुवर्ण क्षण आयुष्याचे
असेच विरून जातात
हसवू फसवू स्वतःलाच
जगण्याचा आनंद घेऊ
दुसर्यासही आनंद देऊ
एकमेकांच्या आयुष्यात आनंद ठेऊ
कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
8208667477.
7588318543.