21 मार्च कविता दिनानिमित्त माझी एक कविता
कविता
हे कविता
आजचा सूर्य उगवला
तुझ्या सन्मानासाठी
पर्यायाने
एका कवीच्या
काव्य प्रतिभेच्या सन्मानासाठी
मिळेल तुला
अन् तुझ्या रचनाकाराला
पुष्प सुमनांनी भरलेले
हार-तुरे पुष्पगुच्छ
उधळतील तुझ्यावर
शब्द सुमने स्तुतीसुमने
आज तुझा
जागतिक कविता दिवस
साजरा होतोय म्हणून….
तुझ्या या
सत्कार समारंभांनी
तू गर्विष्ठ होऊ नकोस
अथवा गहिवरूनही जाऊ नकोस
कारण,
उद्याची सकाळ
तुझ्या ज्ञानदानाच्या
नित्य कार्याची
वाट पाहत असते
तू सदैव जमिनीवरच असते
हे का कवीला ठाऊक नाही?
म्हणूनच तो साठवीत राहतो
शब्द भांडवल
त्याच्या मेंदूच्या एका कोपऱ्यात
एक कविता पुनर्जन्मीत व्हावी म्हणून…
उगवत्या सूर्याची वाट पहात
काल्पनिक स्वप्ने रंगवून
तुझ्या वरील प्रेमाचा झरा
आटू नये म्हणून
लिहितो कागदावर
रोज एक कविता
त्याच्यासाठी तुझा काव्य दिन
रोजच असतो
कवीच्या हृदयात
तुझे स्थान असते
म्हणून
तुला एकच सांगणे
गर्वाला दूर सारून
सदैव ज्ञानदानाचे कार्य करीत
जमिनीवरच राहा
हे कविता…
हे कविता… हे कविता….
कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
7588318543.
8208667477
Posted inमराठी कविता (Marathi Kavita)