Pavsachi kavita marathi

पाऊस कविता मराठी
पाऊस कविता मराठी

Pavsachi kavita marathi

सर पावसाची व्हावे Pavsachi kavita

सर पावसाची व्हावे
सर पावसाची व्हावे
सरसर बरसावे
नदी सागरी वहावे
       दरी डोंगर पहावे॥धृ ॥
दरी डोंगरा मधून
अडखळत वहावे
छोटे मोठे खडकही
         मागे सारतच जावे॥१॥
उंच डोंगरा वरुन
धबधबे ही पहावे
सर एक मिसळून
        तेथूनही कोसळावे॥२॥
वृक्ष वल्लरींना जल
जाता जाता पुरवावे
नव्या सृष्टीने नव्याने


         पुन्हा बहरुन यावे ॥३॥
पशू पाखरांना नवे
अन् संजीवन द्यावे
पूर महापूर पण
माझ्या वाट्याला न यावे॥४॥
माझ्या सरीत सरीत
जन अवघे नहावे
वय सारुन बाजूला
   सान थोरांनीही व्हावे॥५॥
येरे येरे पावसाचे
अन् गाणे गुणगुणावे
येगं येगं सरी पुन्हा
   गाण्या मधून म्हणावे॥६॥
रिमझिम स्वरासवे
धावतच मीही यावे
झिमझिम  झिम्मा अन्
    चिमुकल्यांशी खेळावे॥७॥
गमे म्हणून एकदा
पावसाची सर व्हावे
मुक्तसर मोतियांची
        व्हावे अन् बरसावे॥८॥
  निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पाऊस kavita marathi
पाऊस kavita marathi

कधी पाहिनसे झाले Pavsachi kavita

        कधी पाहिनसे झाले
किती कसे बोलवावे
येता जाता  पावसाला
किती विनविले याला
          भाव खातो हा कशाला ॥धृ॥
बोलाविता कोरडही
पहा पडली घशाला
कोण बोलाविन मग
             गाणे म्हणून अशाला ॥१॥
कसे करावे स्मरण
बालपणीच्या गीताला
येरे येरे पावसाच्या
           ध्वनी-स्वर नि तालाला ॥२॥
नाही अंगणास पाणी
नाही गाणं ही ओठाला
नाही उरलेही पाणी
            आता एकाही घोटाला ॥३॥
कधी पाहिनसे झाले
झिमझिम पावसाला
नभी झुंजल्या वार्याला
          काळ्या काळ्या कापसाला ॥४॥
   निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.

Pavsachi kavita marathi
Pavsachi kavita marathi

नको नको रे पावसा

         तुझे पाहू दे नर्तन
नको नको रे पावसा
काही तुझिया वाचून
शेत मळ्यात अंगणी
         तुला पाहू दे साचून॥धृ॥
नको भजन पुजन
नको कोणते किर्तन
रिमझिम झिमझिम
           तुझे पाहू दे नर्तन॥१॥
तुझी साचल्या पाण्यात
पाहू देरे आवर्तनं
अन् कागदी नावांचं
            हळुवार तरंगनं॥२॥
रंग इंद्रधनुचे ही
कधी त्यात मिसळणं
काळ्या सावळ्या ढगांचं
        मधूनच डोकावणं॥३॥
पुन्हा पहावे केंव्हा हे
तुझे ऐकावे वर्णन
म्हणूनच झिमझिम
      तुझे पाहू दे नर्तन॥४॥
     निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

जागतिक जल दिन
जागतिक जल दिन

नको होऊस फितूर Pavsachi kavita

नको होऊस फितूर
यंदा येशिल जलद
लाविलीस हुरहुर
येरे पावसा स्वागता
झालो आम्हीही आतुर ॥धृ॥
तुझी ऐकता चाहूल
जरी जरा दूरवर
अति उष्म्याने हैरान
     जिवा वाटलेही बरं ॥१॥
येरे येता येता पण
नको रेंगाळूस बरं
अन् वादळी वार्यांना
    नको होऊस फितूर ॥२॥
आतूरले शेतकरी
तहानले ही पाखरं
आसावल्या धरतीची
      पहा एकदा नजर॥३॥
तिची येऊ दे करुणा
व्हावे पुढ्यात हजर
उन्हा तान्हात शिणल्या
    आण रुपाला बहर॥४॥
         निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

पावसाचं बडबडगीत

पावसाचं बडबडगीत
      [बोलगाणं]
मानसूना मानसूना
रुसलास का ?
अंदमानी जाऊन
बसलास का ?
महाराष्ट्रात माझ्या
येशील का ?
येरे येरे ये चं गाणं
ऐकशिल का ?
तुझ्या सरींनी कळशी माझी
भरशिल का ?
वाहिली तर वाहू दे
पण सांग मला आधी
मानसूना लवकर
येशिल का ? येशिल का ?
तुझ्या स्वागताची कांदाभजी
खाशिल का ? खाशिल का?
गरम गरम चहाचा स्वाद
घेशिल का ? घेशिल का ?
पण चहात नको बाबा
कुठलीही माशी
नाहि तर….
शेतकरी दादा माझा
राहिन उपाशी॥
         निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.

Pavsachi kavita marathi
Pavsachi kavita marathi

Pavsachi kavita marathi

अरे अरे तु पावसा



 

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *