Pavsachi kavita marathi पावसाची कविता मराठी
Pavsachi kavita marathi
पाऊस
सूर माझ्या दे स्वरास
येरे येरे ये पाऊस
नको उगीच भिऊस
पावसात भिजायची
तूच पुरवी रे हौस॥धृ॥
उगीचच यायचा रे
नको दाखवू आभास
शेतकरी भाऊ माझा
बघ बसला उदास॥१॥
धरा झाली रडवेली
म्हण तिला थोडी हास
आता येशिल येशिल
काय दावितोस भास॥२॥
तुझे म्हणते रे गीत
येरे येरे ये पाऊस
येरे येरे म्हणताच
नको भाव ही खाऊस॥३॥
भाव त्यातूनच थोडा
आला माझिया स्वरास
सरसर झरझर
सूर माझ्या दे स्वरास॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
येरे नैऋत्य मोसमी
येरे नैऋत्य मोसमी
ऋतू तुझा पावसा रे
आला आहे का रे याद
तुझ्या आधी वादळीचे
बघ सुरु झाले वाद॥धृ॥
कोसळले किती याने
वृक्ष वल्ली ह्या वादात
येरे नैऋत्य मोसमी
रिमझिम च्या नादात॥१॥
प्राण वायूचे वाहक
वृक्ष जाहले बर्बाद
तुझ्या वाचून कसे रे
सांग व्हावे ते आबाद॥२॥
प्राणवायू च्या वाचून
झाली जीवनेच बाद
झाडे लावू नि वाढवू
पण तुझी हवी साथ॥३॥
माझी कविता ही बघ
तुला घालिते रे साद
येरे नैऋत्य मोसमी
देरे तिला प्रतिसाद ॥४॥
इथे तिथे सारीकडे
किती माजलेत वाद
काही केल्या लाभेनाच
कुठे जराही संवाद॥५॥
तुझ्या रिमझिम सवे
करु म्हणते संवाद
म्हणूनच येण्यासाठी
देऊ म्हणते रे याद॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
प्राण कंठाशी रे आला
प्राण कंठाशी रे आला
तुझ्या वाचून मेघा रे
बघ झाल्या अवकळा
किती काळ सोसाव्या रे
धराईने उष्ण झळा ॥धृ॥
आम्ही लेकरे तियेची
गाणे तुझे गातो गळा
पाण्या वाचून कसे ही
गाणे खुलावे रे गळा॥१॥
वृक्ष वेली करपल्या
झाला पुरता पाचोळा
आधी शिशिराने केला
आता तुझाविणा झाला॥२॥
तुझे गाणे गाण्यासाठी
खुलवावी शब्दकळा
नाही ओल ही घशाला
कसा स्वर व्हावा ओला॥३॥
तरी शब्दझुल्यावर
गीत घेते हे हिंदोळा
नाही गुंज नाही मासा
तरी शब्द एक तोळा॥४॥
तुझ्यासाठी मेघराजा
स्वर सोनियाचा झाला
वाट पाहते धराई
प्राण कंठाशी रे आला॥५॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.
शोध पावसाचा
शोध पावसाचा
कुठे कसा शोधावा रे
कळेनाच पावसास
जारे जारे कुणी तरी
याचा करा रे तपास॥धृ॥
निसर्गाच्या परिक्षेत
गमे झाला हा नापास
सांगा कुणीतरी याला
कारे हिरमुसलास॥१॥
येरे पावसा नको रे
असा होऊस उदास
आज नाही तर उद्या
बघ होशिलच पास॥२॥
झालो अधिर कधीचे
आम्ही तुझ्या ओलाव्यास
नदी नाले धरणास
पाणी देरे तलावास॥३॥
किती सांगू थकले रे
तुला पावसा खुळ्यास
केंव्हा येशिल कधी रे
माझ्या जळगांव धुळ्यास॥४॥
आला म्हणे इथे तिथे
आला म्हणे केरळास
आला आणि कुठे कुठे
आला माझ्या महाराष्ट्रास॥५॥
मनी योजिले उद्दिष्ट
पुरे कर उद्दिष्टास
फळ देरे प्रतिक्षेचं
माझ्या बळीच्या कष्टास॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
मान्सूनच हो लांबलं
कोण याला हो झेलेल
कसं कुठून हे आलं
झंझावात हे रेमल
याच्या येण्यानंच येणं
मान्सूनच हो लांबलं॥धृ॥
मान्सूनच्या वार्यांना का
ऐनवेळी थांबविलं
असं अगंतुका परि
येणं याला कां शोभलं॥१॥
याचं झंझावाती येणं
कधी कुणा का भावलं
आल्यापरी परतावं
याचं माघारी पाऊल॥२॥
हवा आम्हास मान्सून
त्याची पाऊस पाऊलं
अधे मधेच रेमलं
कसं कुठून हे आलं॥३॥
हद्दपार आता तरी
याला पाहिजेच केलं
आगंतुक हा पाहुणा
कोण याला हो झेलेल॥४॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
स्वर तुझा निनादू दे Pavsachi kavita marathi
स्वर तुझा निनादू दे
किती पहावी रे वाट
आला पावशा रे जून
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा चा
स्वर तुझा न अजून॥
ऐकू पाहतो रे बळी
तुझ्या संकेताची धून
केंव्हा करावी पेरणी
कसे यावे रे कळून॥
अजूनही चालू आहे
कोकीळेचे ही गुंजन
स्वर तुझा हवा आहे
पुरे जाहले रंजन॥
कण कण मातीचाही
चिंब व्हावा रे भिजून
आसुसली धरा राणी
बघ जरा केंव्हाहून॥
धाड पावसाची सर
अरे पावशा म्हणून
अधिरले बघ कान
तुझी ऐकण्यास धून॥
ऐकू देरे पेर्ते व्हा ची
धून तुझीच म्हणून
दाही दिशात राहू दे
स्वर तुझा निनादून॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
येगं सरी सरसर Pavsachi kavita marathi
येगं सरी सरसर
कधीचाच ऐकला ग
बघ पेर्ते व्हा चा स्वर
तुही ये ग सरसर
आता पावसाची सर॥धृ॥
किती काळ पाहू वाट
किती केलास उशिर
वारा तुझा वाहतो ग
घुमतोही भिरभिर॥१॥
त्याच्या सोबत तरी ग
सरी ये गं सरसर
तुझ्यासाठी लिहिल्या मी
कविताही भाराभर॥२॥
थोडासाही तुझ्यावर
कसा होईना असर
किती सांगू आता तरी
अवतरी ह्या भुवर॥३॥
तुझ्यासाठी बळीराजा
अति झालासे आतुर
किती काळ लावशिल
सांग त्याला हुरहुर ॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
मो.नं.९३७१९०२३०३
झाला बघ विपर्यास
सात जून दिन तुझा
विसरुन कां गेलास
तुझ्या सवे जात होतो
आम्ही मुले ही शाळांस॥धृ॥
तुझ्या सवे भिजण्याची
काय मौज असे खास
नव्या वह्या पुस्तकांची
चिंता असेही मनास॥१॥
नवा वर्ग नवे मित्र
असे नवाच उल्हास
खळग्यातल्या जळात
पाहू इंद्रधनुष्यास॥२॥
कधी पहात असू रे
थेंब थेंब वलयांस
किती लोभस दृश्य हे
मिळतसे पाहण्यांस॥३॥
भिजण्याची मजा आणि
काही और असे खास
येरे येरे गाण्यासवे
मौज येई नाचण्यास॥४॥
वेळेवर आता पण
सांग कांरे येईनास
म्हणूनच झाला बघ
आमुचाही विपर्यास॥५॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३.
शब्दसरी
आला जेष्ठाचा महिना
येरे तुही जेष्ठापरी
येरे घेऊन पावसा
तुझ्या अमृताच्या सरी॥धृ॥
अति उष्याने त्रस्तली
धरा कशी धीर धरी
तुझ्या वाचून सांग रे
किती काळ तग धरी॥१॥
झाली बघ अर्धमेली
येई जीवना सत्वरी
भेगा गेल्या खोलवरी
तूच तिचा तारण्हारी॥२॥
प्रतिक्षेत ती तुझिया
तार तूच आता तरी
आला म्हणे सारीकडे
येरे खान्देश भुवरी॥३॥
सरी सोड सोनसरी
तुझ्या सरीवर सरी
कर माझी धराराणी
पुन्हा एकदा हासरी॥४॥
बघ मीही दिल्या तुला
अगणित काव्यसरी
भावतील बघ तुला
माझ्याहीरे शब्दसरी॥५॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.
Pingback: Pavsachi kavita marathi - मराठी 1
Pingback: जय जिजाऊ गीत जिजाऊंचे गाऊ - मराठी 1