marathi ukhane
marathi ukhane
स्त्रियांसाठी सोपे उखाणे १ ते ५०
marathi ukhane for female
५१. लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, —- नाव घेऊन उखाणा करते पुरा.
५२. पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवीगार, – च्या जिवावर घालते मंगळसूत्राचा हार.
५३. अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, रावांना घास देते वरण-भात-तुपाचा.
५४. बंधू प्रेमासाठी राज्यपद त्यागिले, • च्या नावाबरोबर गृहिणीपद स्वीकारले.
५५. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, • चे नाव घेते सर्वांचा मान राखून.
५६. राम गेले वनात, भरत आले भेटी, • चे नाव घेते सर्वांसाठी.
५७. मंगलकार्यात लोक करतात आहेर,
चे नाव घेऊन सोडले माहेर.
५८. समुद्राच्या शिंपल्यात सापडले मोती, रावांच्या जीवनात मी आहे सारथी.
५९. उगवला चंद्र रजनीला लागली चाहूल,
रावांचं नाव घेऊन संसारात टाकते पाऊल. ६०. शाहू महाराज बांधतात कोल्हापुरी फेटा,
– रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा.
६१. आदगर माजघर, माजघरांत पलंग, पलंगावर उशी, रावांच्या जिवावर मी आहे खुषी.
६२. सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास, ना देते मी जिलबीचा घास.
६३. लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास,
• रावांना भरवते लाडवाचा घास.
६४. सतारीचा नाद, वीणेचा झंकार, • च्या समवेत सुरू झाला संसार.
६५. मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार, • च्या जीवनस्पर्शाने उमटतील झंकार.
६६. निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात,
अर्धांगी म्हणून
च्या हाती दिला हात.
६७. चंद्राचा होतो उदय, सागराला येते भरती, रावांच्या शब्दाने सारे श्रम हरती.
६८. रत्नजडित सिंहासनावर गणपतिराय राजा, – नाव घेत पहिला नंबर माझा.
६९. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, •चं तेज आहे माझ्या कुंकवावर.
७०. मावळला सूर्य, परतले पक्षी, च्या प्रेमाला परमेश्वर साक्षी.
७१. माहेरचे दिवस माझे पाखरासारखे उडाले, तेथील स्मृतिकण घेऊन चे घरी आले.
७२. भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची, ना घास देते पंगत बसली थोरांची.
७३. सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवनवस्त्र विणले, • च्या सहवासात भाग्य माझे हसले.
७४. आई माते मंगळागौरी, नको मला कीर्ती आणि संपत्ती, सदैव राहू दे मला च्या संगती.
७५. शृंगारलेला हत्ती मांडवापुढे झुले, – रावांना आवडतात मोगऱ्याची फुले.
७६. हिमालय पर्वतावर बर्फाचा पाऊस, – रावांचे नाव घेते- नी केली हौस.
७७. सासर-माहेरची मंडळी आहेत हौशी, रावांचं नाव घेते च्या दिवशी.
७८. गिरीजाशंकर, सीता-राम यांना गुरु करू, राव आपण दोघे संसारसागर तरू.
७९. रुप्याच्या डबी, त्यात अत्तराचा बोळा, रावांचे बोलणे शंभर रुपये तोळा.
८०. कुरुंदाची सहाण, चंदनाचे खोड,
रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.
८१. आधी घातला चंद्रहार, मग घातली ठुशी,
रावांचे नाव घ्यायला माझी नेहमीच खुशी.
८२. पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर, रावांच्या सेवेला नेहमीच हजर.
८३. देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान, रावांचे नाव घेते, ऐका देऊन कान.
८४. गौरीहार पुजले अन् बोहल्यावर चढले, • रावांच्या सुखासाठी संसारात गढले.
८५. पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा, – रावांच्या नावाने भरला हातात चुडा.
८६. गाईच्या शिंगांना लावला सोनेरी रंग, – राव बसले कामाला की होतात त्यात दंग.
८७. आईनं वाढवलं, वडिलांनी पढवलं, • रावांनी त्यांची होताच सोन्यानं मढवलं.
८८. मोत्यांचे पेले पाहून चंद्रसूर्य हासे, जमलेल्या मंडळीत राब खासे.
८९. रुप्याची सरी, तिला सोन्याचा गिलावा, सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा.
९०. दारी होता कोनाडा, त्यात होता पैका, चे नाव घेते ते सर्वजण ऐका.
९१. श्रावणमासी ऊन पावसाचा चालतो खेळ, •चे नाव घेण्यास लावत नाही वेळ.
९२. संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती, रावांशी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती.
९३. लांबसडक वेणीवर शोभे गुलाबाचं फुल, – रावांना पाहताच पडलीय मला भूल.
९४. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, रावांच नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
९५. नक्षीदार चंदनी देव्हाऱ्यात चांदीची गणेशाची मूर्ती, – च्या नावाने घराण्याची वाढवीन कीर्ती.
९६. कोजागिरीच्या रात्री उमाशंकर खेळती सारिपाट, चे नाव घेतले आता सोडा माझी वाट.
९७. यमुनेच्या काठी कृष्ण वाजवी पावा, •चे नाव घेते सर्वांनी लक्षपूर्वक ऐका.
९८. नम्रता लीनता हीच खरी स्त्रीची चारुता, चे नाव घेते आपणा सर्वांकरिता.
९९. मानससरोवरात राजहंस मोती भक्षी, आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी.
१००. आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल, च्या जोडीने संसारात टाकते पाऊल.
Pingback: marathi ukhane for female - मराठी 1