पानगळीचा सडा
पानगळीचा सडा मराठी कवीता
मराठी कवीता पानगळीचा सडा
संपली हिरवाई संपला वसंत
संपला ऋतू हिवाळा
रणरणते ऊन घेऊन आला
आला ऋतू उन्हाळा
चैत्र पालवी सुखावली
वैशाखाच्या उन्हात सुकून गेली
वर्षाऋतू येण्याआधी
पानगळ हो झाली
ग्रीष्माच्या दाहकतेत
होरपळते नित्य जगणे
पानगळीला कात टाकून
सुकली सारी पाने
सडासंमार्जन पानगळीचा
शोभून दिसला वनात
वाऱ्यालाही जोर सुटला
गाऊ लागला जोरात
जन्म मृत्यूचे चक्र चालते
सुटले पाश कुणा
मृत्युला ही कवटाळती मग
पाने आनंदाने पुन्हा
पान गळतीचा सोहळा हा
कळे ना कधी कुणा?
शुष्क कोरडे दृश्य परि
शिकवते पाना पानाचा महिमा
हिरवा शालू कधी नेसते
कधी नेसते करडा
अवनी ही लखलखते चमचमते
घेते भिजून पानगळीचा सडा
पानगळीचा सडा कवितेचे कवी
कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे
7588318543.
Pingback: जागतिक चिमणी दिन मराठी कवीता - मराठी 1
Very Nice
अतिशय छान लिंकद्वारे उपलब्ध करुन दिले
Pingback: मराठी कविता दार उघडलं - मराठी