पण त्यासाठी व्हावं रे Marathi kavita paus
🌧पण त्यासाठी व्हावं रे🌧
झिमझिम रिमझिम
तुझी पावसारे धून
येरे ये ची सुरु झाली
तशी ओठी गुणगुण॥धृ॥
खुश झालेही ऐकून
मीही नैसर्गिक धून
तुला पाहते येतांना
दारा खिडकी मधून॥१॥
कधी पाहते येतांना
आणि ओसरी मधून
ओंजळीत ही पाहते
थेंब जरासे झेलून॥२॥
चिंब भिजले पाहते
क्षण बालस्मृतीतून
बाल विश्वात फिरावे
सर तुझीच होऊन॥३॥
शाळेतून येता जाता
चिंब होतसे न्हाऊन
तुझे येरे ये चे गीत
तसे पहावे गाऊन॥४॥
कुणी हसेल हसू दे
थोडे पहावे नाचून
क्षणभर रमवावे
मन तुजला पाहून॥५॥
पण त्या साठी व्हावं रे
तुझं पुन्हा पुन्हा येणं
जसं माझ्या ओठी येतं
गाणं फिरुन फिरुन॥६॥
— निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::