महात्मा ज्योतिबा फुले जयंती
कविता संग्रह मांगल्याचा झरा
महात्मा
ज्योत ज्ञानाची सावित्री
जोतिरावां नी लावली
त्याच ज्योतीची किरणे
आम्हातून प्रकाशली ॥धृ॥
मना मनात सात्विक
फुले फुल्यांनी पेरली
सत्यधर्म निर्मियला
जात मानव तारली॥१॥
शेतकर्यां चा आसूड
ग्रंथ संपदा निर्मिली
मुक्त सारीच्या सारीच
अन् गुलामीही केली॥२॥
ज्योत ज्ञानाची लाविली
अंधश्रद्धा संपविली
सूत्र सावित्री च्या हाती
जोतिबांनी सोपविली॥३॥
किर्ती महत्तेची अशी
मुर्ती अमर ही झाली
अन् महात्मा ह्या नावे
जोतिबांची ख्याती झाली॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी , प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
Pingback: satyashodhak samaj सत्यशोधकी लिखाणातून दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज - मराठी
Pingback: satyashodhak movie सत्यशोधक चित्रपट - मराठी
Pingback: नात म्हणे काय बात - मराठी 1