नात म्हणे काय बात

नात
नात

नात

        नात म्हणे काय बात
एक आजी एक नात
जगा वेगळं हे नातं
मन आजीचं नातीत
         वय विसरुन जातं॥धृ॥
आली आली माझी नात
आजी म्हणे अंगणात
स्वर वाजवित पायी
        छुम छुम पैंजनात॥१॥
आजी आजीच्या स्वरास
आली निनादत नात
विसरली आजी भान
      आनंदत त्या नादात॥२॥
आजीसवे खेळ खेळू
आली म्हणतच नात
खेळ कोणात कोणात
    आजी वाचून कोणात॥३॥
रमू आजीच्या गोष्टीत
गोड आणखी गाण्यात
गोष्ट आजीची आजीची
      नात म्हणे काय बात॥४॥

नात
नात


  निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.