दीप दिवाळीचे

दीप दिवाळीचे
दीप दिवाळीचे

दीप दिवाळीचे

       बात एक ध्यानी धरी
पहा दीप दिवाळीचे
पेटलेत घरीदारी
चार दिवस दिवाळी
        दिशा उजळल्या चारी॥धृ॥
दीप जळती जळती
इथे तिथे घरोघरी
तेल दिव्यांतरी सार्या
          जळे पहा कितीतरी॥१॥
किती जरी जाळलेत
तेल दिव्यांच्या अंतरी
मनोदीप उजळेल
         काय दीप एक तरी॥२॥
व्यर्थ जळते दिव्यात
तेल पहा कितीतरी
दीप लावा रे ज्ञानाचा
            दूर अंधार तो करी॥३॥
करा गोड धोड खास
उर्जा साठवा उदरी
थंडी साहण्यास तिच
          कामी येईल रे खरी॥४॥
दाट दाटला अंधार
परी मनांच्या भितरी
जाती पातीचा माजला
           भेद मानवा अंतरी॥५॥
भान याचे यावे जना
जरा विचार हा करी
जात  मानव एकच
           साऊ सांगे परोपरी॥६॥
धर्म एक मानवता
वाणी जोतिबाची खरी
बात महान फुल्यांची
        माणसारे ध्यानी धरी॥७॥

दीप दिवाळीचे
दीप दिवाळीचे

निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.