कवी kavita marathi latest

kavita marathi latest
kavita marathi latest

कवी kavita marathi latest

शब्दांनी मला कवी केलं,कवितेमुळे माझं नाव झालं आणि ज्यांच्यामुळे मी मोठा झालो मान सन्मान देऊन साहित्य क्षेत्रात नावारूपाला आलो साहित्यातील सर्व जीवलग मित्रांमुळे माझी ओळख निर्माण झाली आशा माझ्या सर्व खान्देशातील व महाराष्ट्रातील साहित्यिक मित्रांसाठी नकळतपणे सुचलेली लिहिले कविता सादर करतोय.

संजय धनगव्हाळ

मी किती चांगला
चांगला की वाईट
मला माहित नाही
पण मी गोडवा वाटून ठेवलाय
इथून तिथे
निरोप माझा जाण्याचा कळल्यावर
मित्र माझे सारेच धावत येतील
ते येतील रडतील मला पोहचवतील
त्या नंतर माझी राख होईल
जाता जाता पुन्हा पुन्हा
मागे वळून पाहतील

प्रेम इतकं मिळालं मला की
खुपच घेतल
मी परत फेड करू शकणार नाही
मला माहित आहे
खूप हात लागतील माझ्या सरणाला
पण मी पाहून शकणार नाही

मी साधा सरळ माणूस
पण मला काळजात ठेवला
प्रत्येक माणसा मणसात
मला देव पावला
सारेच सखे सोबती जीवलग माझे
कधी अंतर ठेवत नाही
गळाभेट देताना आढेवेढे घेत नाही

फक्त नावातच माझ्या धन आहे
तरी मी धनवानच समजतो
सरस्वतीचे तुम्ही लेकरे  सारे
मी तुमच्या पंगतीत बसतो
पैसा नसेल माझ्याकडे तरी
चांगल्या माणसांची श्रीमंती आहे
प्रेम जिव्हाळ्याची माणसं सारी
आपुलकीच्या नजरेतून
भाव प्रितीचा वाहे

धन्य झालो मी,
जन्म माझा सार्थकी झाला
असे गणगोत मिळाले,
भाग्य लाभले मला
म्हणून साहित्यक्षेत्रात
मीच अदानी मीच अंबानी
माझ्या इतका श्रीमंत कोणी नाही
अवतीभोवती माझ्या चांगली संगत
हिच माझी साताजन्माची पुण्याई

तेव्हा मी जाईल तुमच्या खांद्यावर
ती अंत्ययात्रा नाही तर 
माझी शोभायात्रा असेल
किती प्रेम तुमचं माझ्यावर
त्या गर्दीतून दिसेल
म्हणून निरोप माझा मिळाल्यावर
तुम्ही धावतच यायचं
सोबतच्या आठवणी आठवत आठवत
घेऊन मला जायचं
कारण तुमचा खांदा लगल्याशीवाय
मी जाणार नाही
तुमच्या अश्रुंशिवाय
चिता माझी पेटणार नाही

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमताई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

kavita marathi latest
kavita marathi latest